भारतीय मुलं ही उपजतच राजकारणी असतात- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 04:15 PM2018-02-16T16:15:07+5:302018-02-16T16:15:19+5:30

आई- वडिलांनी नकार दिला तर ते काम आजीकडून कसे करवून घ्यायचे हे त्यांना चांगलेच समजते.

Indian children are the only beginning politicians - Narendra Modi | भारतीय मुलं ही उपजतच राजकारणी असतात- नरेंद्र मोदी

भारतीय मुलं ही उपजतच राजकारणी असतात- नरेंद्र मोदी

Next

नवी दिल्ली: भारतीय मुलांना जन्मत:च राजकारणाची समज असते, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या  'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देशभरातील विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी तणावमुक्त कसे राहाल, याबद्दल मार्गदर्शन केले. 

यावेळी त्यांनी म्हटले की, एकत्र कुटुंबात राहत असल्याने भारतातील मुले जन्मत:च राजकारणी असतात. आई- वडिलांनी नकार दिला तर ते काम आजीकडून कसे करवून घ्यायचे हे त्यांना चांगलेच समजते. त्यामुळे या ना त्या पद्धतीने ते स्वत:चा कार्यभाग साधतातच, असे मोदींनी सांगताच सभागृहात हशा पिकला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअममध्ये 'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी तणावमुक्त कसे राहाल, याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी एका अकरावीच्या विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मजेशीर प्रश्नही विचारला. पुढील वर्षी (2019मध्ये) माझी बोर्डाची परीक्षा आहे आणि पुढील वर्षीच लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी तुमची तयारी कशी सुरू आहे? विद्यार्थ्याच्या या प्रश्नावर नरेंद्र मोदींनी हसून उत्तर दिलं. 'जर मी तुझा गुरू असतो तर तुला पत्रकार बनण्याचा सल्ला दिला असता. कारण पत्रकारच असे प्रश्न फिरवून विचारू शकतात. मोदी म्हणाले, निवडणूक असो वा परीक्षा दोन्ही वेळी वेळेचा पुरेपुर उपयोग करा, तुम्ही शक्ती भरपूर वापरा. परीक्षा वर्षातून एकदाच येते. तुला बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा! माझ्याबरोबर सव्वाशे कोटी लोकांचे आशिर्वाद आहेत. ती माझी खरी ताकद आहे, असे मोदींनी सांगितले.

Web Title: Indian children are the only beginning politicians - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.