India China FaceOff: भारत-चीनमधील लष्करी स्तरावरील चर्चेची सहावी फेरी ठोस निष्कर्षाविना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 02:40 AM2020-08-09T02:40:14+5:302020-08-09T06:48:57+5:30
चीनचा हेकेखोरपणा कायम; भारत मागणीवर ठाम
नवी दिल्ली : पँगाँग त्सो व डेपसांग क्षेत्रात चिनी सैनिकांनी स्व-हद्दीत मागे जाण्यावर भारत ठाम आहे. शनिवारी दिवसभर लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेदरम्यान भारताने पुन्हा हाच मुद्दा उपस्थित केला. गलवान खोरे व झटापट झाली त्या ठिकाणाहून चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत मागे हटले आहेत, मात्र पँगाँग सरोवराच्या हद्दीतून सैनिकांना मागे येण्याचे आदेश अद्याप चीनने दिले नाहीत. भारतीय अधिकाऱ्यांनी याचीच आठवण चिनी अधिकाºयांना करून दिली. जूनमधील हिंसक झटापटीनंतर सलग सहाव्यांदा दोन्ही बाजूंचे अधिकारी चर्चा करीत आहेत.
मागील आठवड्यात लेफ्टनंट जनरल अधिकाºयांमधील चर्चेनंतर आज कमांडर स्तरावर चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल व चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात ठरल्याप्रमाणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक स्व-हद्दीतून ठरलेल्या ठिकाणी सैन्य माघारीचा पुनरूच्चार भारताने वारंवार केला. प्रत्येक चर्चेदरम्यान सकारात्मक संवादाचा आव आणणाºया चीनने प्रत्यक्षात ही मागणी मान्य केली नाही. गलवान खोºयावर हक्क सांगणाºया चीनने स्वहद्दीत माघार घेतली असली तरी अद्याप पँगाँग सरोवर हाच चर्चेचा मद्दा आहे. फिंगर पॉर्इंट ४, गोगरातून चिनी सैन्य मागे हटले. फिंगर पॉर्इंट ८ जवळूनही सैन्य माघारी परतले. सैन्य पूर्ण मागे हटल्याशिवाय चर्चेस अर्थ राहणार नाही, असेही भारताने आतापयर्Þंतच्या चर्चेदरम्यान सुनावले आहे.