शरणार्थी दहशतवाद्यांच्या पत्नींनी मागितले भारताचे नागरिकत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 09:20 PM2019-05-04T21:20:41+5:302019-05-04T21:21:05+5:30
भारतीय नागरिकत्व द्या अन्यथा आमचे प्रत्यार्पण करा, अशी मागणी य़ा महिलांनी केली आहे.
श्रीनगर : दहशतवादाच्या मार्गावरून बाजुला होत भारतामध्ये शरणागती पत्करलेल्या दहशतवाद्यांच्या पाकिस्तानी पत्नींनी आज जम्मू काश्मिरमध्ये भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी केली आहे. पुनर्वसन योजनेंतर्गत नियंत्रण रेषेच्या पलिकडून आलेल्या या महिलांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे आंदोलन करत ही मागणी केली आहे.
भारतीय नागरिकत्व द्या अन्यथा आमचे प्रत्यार्पण करा, अशी मागणी य़ा महिलांनी केली आहे. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. राज्याची नागरिकता मिळविणे हा आमचा अधिकार आहे, दुसऱ्या देशांतील पुरुषांशी लग्न केल्यानंतर त्यांना त्या देशाचे नागरिकत्व मिळते तसेच आम्हालाही मिळावे. न दिल्यास आमचे प्रत्यार्पण करावे, अशी मागणी या महिलांनी केली आहे.