इराणच्या ताब्यातून भारतीय क्रू मेंबरला मायदेशी आणले; जयशंकर म्हणाले-'ही मोदींची गॅरंटी...'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 07:03 PM2024-04-18T19:03:16+5:302024-04-18T19:03:58+5:30
गेल्या पाच दिवसांपासून इराणच्या ताब्यात असलेल्या इस्रायली जहाजावर भारतीय क्रू मेंबर्स अडकले आहेत.
Iran-Israel War : गेल्या अनेक दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढला आहे. अशातच, इराणने ताब्यात घेतलेल्या कंटेनर जहाजावरील काही भारतीय क्रू मेंबर्स अडकले आहेत. यातील एकाची इराणने सुटका केली आहे. केरळच्या थ्रिसूर येथील रहिवासी असलेल्या ॲन टेसा जोसेफ सुखरूप भारतात परतल्या. यावर आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका X पोस्टमध्ये एस जयशंकर म्हणाले, "मोदींची गॅरंटी नेहमीच देशात किंवा परदेशात पोहोचते."
दरम्यान, केरळच्या त्रिशूर येथील भारतीय डेक कॅडेट ॲन टेसा जोसेफ MSC Aries जहाजावर क्रू मेंबर होत्या. त्या आज भारतात परतल्या. इराणमधील भारतीय दूतावासाने इराणच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांना परत येण्याची सोय केली. उर्वरित 16 क्रू मेंबर्सना परत आणण्यासाठी आम्ही इराणच्या संपर्कात आहोत.
Great work, @India_in_Iran . Glad that Ms. Ann Tessa Joseph has reached home. #ModiKiGuarantee always delivers, at home or abroad. https://t.co/VxYMppcPZr
— Dr. S. Jaishankar (Modi Ka Parivar) (@DrSJaishankar) April 18, 2024
जहाजावर 17 भारतीय क्रू मेंबर्स अडकले
इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी मंगळवारी मीडियाला सांगितले की, कंटेनर जहाजावरील सर्व 17 भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. पर्शियन खाडीतील हवामान ठिक नाहीये. हवामान स्वच्छ झाल्यानंतर जहाजावरील उर्वरित भारतीयांना घरी पाठवले जाईल.
इराणने 13 एप्रिल रोजी हे जहाज ताब्यात घेतले
इराणने 13 एप्रिल रोजी इस्रायलचे हे जहाज ताब्यात घेतले होते. इराण रिव्होल्युशनरी गार्डच्या कमांडोंनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या जहाजावर हल्ला चढवला आणि जहाज इराणला नेले. या जहाजाची मालकी एका इस्रायली व्यावसायिकाच्या हाती आहे. या जहाजाद्वारे परदेशी मदत इस्रायलला पाठवली जात असल्याचा संशय इराणला होता. त्यामुळेच त्यांनी जहाज ताब्यात घेतले.