"शत्रूला समुद्राच्या तळाशी जाऊन शोधून काढू अन् नेस्तनाबूत करू"; संरक्षण मंत्र्यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 01:21 PM2024-02-03T13:21:09+5:302024-02-03T13:21:43+5:30

INS संध्याक नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाल्यानंतर राजनाथ सिंह गरजले!

Indian Defence Minister Rajnath Singh Said We Will Find and destroy the enemy | "शत्रूला समुद्राच्या तळाशी जाऊन शोधून काढू अन् नेस्तनाबूत करू"; संरक्षण मंत्र्यांचा निर्धार

"शत्रूला समुद्राच्या तळाशी जाऊन शोधून काढू अन् नेस्तनाबूत करू"; संरक्षण मंत्र्यांचा निर्धार

Rajnath Singh, INS Sandhyak : भारतीय नौदलाला आता आणखी एक स्वदेशी युद्धनौका मिळाली आहे, जी समुद्रातील धोक्यांचा क्षणार्धात मुकाबला करेल आणि चीन-पाकिस्तानला चांगलाच दणका देईल. शनिवारी INS संध्याकचा नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. ही युद्धनौका समुद्रातील अडचणींचा सामना करण्यात माहिर आहे. त्यावर बोफोर्स तोफा बसवण्यात आल्या आहेत. ही युद्धनौका पाण्यात धावताच शत्रूवर मात करण्यास सक्षम असेल. या दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आयएनएस संध्याकच्या कमिशनिंग सोहळ्यात सांगितले की, भारतीय नौदलासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आमच्या नौदलात आयएनएस संध्याकचा समावेश झाल्यामुळे संपूर्ण प्रदेशात शांतता आणि सुरक्षा राखण्यात आमच्या नौदलाला नक्कीच मदत होईल, असे म्हणत त्यांनी भारतीय नौदलाचे अभिनंदन केले.

ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आम्हाला अनेक आघाड्यांवर अडचणी येत होत्या, पण एक राष्ट्र म्हणून आम्ही आमच्या सुरक्षेसाठी पुढे जात राहिलो. आपण अनेक हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण केले आहे आणि आज आपण विकासाच्या वाटेवर खूप प्रगती केली आहे, विशेषतः जर मी आपल्या नौदल शक्तीबद्दल बोललो तर आपले नौदल इतके मजबूत झाले आहे की आपण हिंदी महासागरातील सुरक्षेच्या बाबतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.

संरक्षण मंत्री म्हणाले की, मला वाटते की INS संध्याक इंडो-पॅसिफिक क्षेत्रात महासत्ता म्हणून भारताची भूमिका अधिक मजबूत करेल. नुकतेच आयएनएस इम्फाळच्या कमिशनिंग सोहळ्यात मी सांगितले होते की, जे लोक नापाक कृत्य करत आहेत, त्यांना आम्ही समुद्राच्या तळापासून शोधून काढू आणि कठोर कारवाई करू. मी आज पुन्हा त्याची पुनरुच्चार करतो. सागरी चाचेगिरी आणि तस्करीत गुंतलेल्या लोकांना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, ही नव्या भारताची प्रतिज्ञा आहे.

Web Title: Indian Defence Minister Rajnath Singh Said We Will Find and destroy the enemy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.