भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत - मनमोहन सिंग
By admin | Published: January 30, 2017 06:19 PM2017-01-30T18:19:44+5:302017-01-30T18:19:44+5:30
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला असताना देशाच्या आर्थिक स्थितीवरून
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला असताना देशाच्या आर्थिक स्थितीवरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत गंभीर खुलासा करत मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. पंतप्रधान मोदींकडून काहीही दावे करण्यात येत असले तरी सध्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असल्याचा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे.
आज दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनमोहन सिंग आणि पी. चिदंबरम यांनी देशातील आर्थिक स्थितीबाबतचा अहवाल सादर केला. यावेळी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत दोघांनीही परखड मत मांडले. यावेळी माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम म्हणाले, "मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली आहे. तसेच गुंतवणुकीतही घट झाली आहे. विकासाचा दरही मंदावला आहे. मात्र असे असतानाही उद्या जाहीर होणाऱ्या आर्थिक सर्वेत सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत गुलाबी चित्र रंगवण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सरकारला देशातील आर्थिक समस्यांबाबत सवाल केले पाहिजेत."
"भाजपा सरकार जीडीपीच्या आकड्यांमागे लपत आहे, पण या आकड्यांच्या खेळाला देशातील नागरिक भूललेले नाहीत. नोकऱ्या कुठे आहेत? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे," असा टोलाही चिदंबरम यांनी लगावला.
Indian economy not in good shape: Former Prime Minister Manmohan Singh pic.twitter.com/mVikBAmaYD
— ANI (@ANI_news) 30 January 2017
Yet if Government presents tomorrow a rosy picture of the economy, people of India are entitled to question that: P Chidambaram, Former FM pic.twitter.com/4nyD21UCAm
— ANI (@ANI_news) 30 January 2017