भारतीय अर्थव्यवस्थेचा यंदाचा विकासदर 7.6 टक्के
By admin | Published: May 31, 2016 08:37 PM2016-05-31T20:37:23+5:302016-05-31T21:06:00+5:30
आर्थिक वर्षात एकूण जीडीपमध्ये झालेली 7.6 टक्के वाढ ही पाच वर्षांतील सर्वाधिक वाढ असल्याची नोंद झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31- भारतीय अर्थव्यवस्थेत दिवसेंदिवस सुधारणा होते आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्पादन क्षेत्रात चौथ्या तिमाहीत 9.3 टक्के विकासदराची नोंद झाली. तर भारतीय अर्थव्यवस्थेत 2015-16च्या चौथ्या तिमाहीत विकासदरात 7.9 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. भारतीय अर्थव्यवस्थेत आर्थिक वर्षात एकूण जीडीपीमध्ये झालेली 7.6 टक्के वाढ ही पाच वर्षांतील सर्वाधिक वाढ असल्याची नोंद झाली आहे. प्रामुख्यानं उत्पादन आणि कृषी क्षेत्रात यंदा चांगली कामगिरी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं (सीएमओ) उघड केली आहे. उत्पादन क्षेत्रात चौथ्या तिमाहीत 9.3 टक्के विकासदराची नोंद झाली. तर शेती क्षेत्रात 2.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल ते जून या आर्थिक वर्षात जीडीपी 7.5 टक्के असून, चौथ्या तिमाहीत विकासदरात सुधारणा झाल्याची माहिती सीएमओनं दिली आहे. जुलै-सप्टेंबर महिन्यात 7.6 टक्के विकासदर, ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात 7.2 टक्के विकासदराची नोंद झाली. 2015-16 या आर्थिक वर्षात 7.6 टक्के विकासदराची झालेली नोंद ही फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या आढाव्यात राष्ट्रीय उत्पन्नाच्या समान असल्याचीही माहिती सीएमओनं दिली आहे.