चीनची हायस्पीड ट्रेन कंपनी बनवणार भारतीय रेल्वेची इंजिने

By Admin | Published: August 22, 2016 05:11 AM2016-08-22T05:11:57+5:302016-08-22T05:11:57+5:30

भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात लवकरच एक महत्वाची घटना घडणार आहे.

Indian engine engineer to make China's high speed train company | चीनची हायस्पीड ट्रेन कंपनी बनवणार भारतीय रेल्वेची इंजिने

चीनची हायस्पीड ट्रेन कंपनी बनवणार भारतीय रेल्वेची इंजिने

googlenewsNext


नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात लवकरच एक महत्वाची घटना घडणार आहे. चीनची सर्वात मोठी हायस्पीड ट्रेन कंपनी रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन (सीआरआरसी) भारतात उभय देशांच्या संयुक्त प्रकल्पाच्या स्वरूपात हरयाणात रेल्वे इंजिने बनवण्याचा आणि दुरूस्त करणारा कारखाना सुरू करणार आहे. या कारखान्यामुळे भारतीय रेल्वे इंजिनांचे बाह्य स्वरूपही बदललेले दिसेल.
‘मेक इन इंडिया’ या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी घोषवाक्याला अनुसरून सीआरआरसी पायोनियर इंडिया इलेक्ट्रिक
कंपनी लि. या नावाने सुरू होणारा ६ कोटी ३४ लाख डॉलर्स (४२५ कोटी रूपयांचा) हा संयुक्त प्रकल्प, भारतीय रेल्वेच्या इतिहासात चीनची
पहिली मोठी गुंतवणूक आहे. उभय देशांच्या या संयुक्त कंपनीत
चीनचा भांडवली सहभाग ५१ टक्के आहे.
सीएनआर कॉर्प व चायना सीएसआर च्या विलिनिकरणातून सीआरआरसी कंपनी अस्तित्वात आली. चीनची ही कंपनी
जगातल्या १0१ देशांना रेल्वेसाठी
सध्या आवश्यक उपकरणे पुरवते.
२0१५ साली उत्तर अमेरिकेतील मेसाच्युएटस येथे सीआरआरने कारखाना उभारला. भारतीय बाजारपेठेत सीआरआरसी २00७ पासून कार्यरत आहे. सब वे
ट्रेन्स, लोकोमाटिव्ह इंजिने, रेल्वे व्हेईकल्स व त्यांचे सुटे भाग या कंपनीतर्फे भारताला पुरवले जातात.
भारतातल्या अनेक रेल्वे
इंजिनिअर्सचे प्रशिक्षणही चीनमधे झाले आहे.
भारतात रेल्वेचे विशाल नेटवर्क लक्षात घेता केवळ हरयाणात होऊ घातलेल्या एकाच प्रकल्पात भागीदारी करून ही कंपनी थांबू इच्छित नाही, तर ट्रेनचे इंजिन, लोकोमोटिव्ह
ट्रॅक्शन सिस्टीम तयार करणारे अनेक कारखाने देशात उभारण्याबरोबर भारताची विविध क्षेत्रातली
पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेउन भूगर्भातून तेल काढणे, पवनचक्क्यांची निर्मिती व उभारणी करणे, खाणकामासाठी उपयुक्त उपकरणांचे भारतात उत्पादन करणे, आदी
क्षेत्रातही काम करण्याची तयारी कंपनीने चालवली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>भारतात रेल्वे विद्यापीठ उभारण्यालाही मदत
भारतीय रेल्वे हे ६४ हजार किलोमीटर्स अंतराचे जगातले सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. या महाकाय रेल्वे नेटवर्कसाठी उभय देशांच्या संयुक्त प्रकल्पाव्दारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्यासह इलेक्ट्रिक ट्रान्समिशनमधे मदत करण्याचा सीआरआरसी कंपनीचा मनोदय आहे. भारतात रेल्वे विद्यापीठ उभारण्याच्या संकल्पनेलाही चीनने या कंपनीव्दारे मदतीचा हात पुढे केला आहे.

Web Title: Indian engine engineer to make China's high speed train company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.