अमेरिकेत भारतीय इंजिनिअरची गोळ्या झाडून हत्या
By admin | Published: February 24, 2017 10:15 AM2017-02-24T10:15:05+5:302017-02-24T12:26:06+5:30
हैदराबादमधील एका इंजिनिअरची बुधवारी रात्री अमेरिकेतील कॅन्सस शहरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कॅन्सस (अमेरिका), दि. 24 - हैदराबादमधील एका इंजिनिअरची बुधवारी रात्री अमेरिकेतील कॅन्सस शहरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय इंजिनिअरवर गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोर 'माझ्या देशातून चालता हो' असे ओरडत होता.
या घटनेत मृत पावलेल्या इंजिनिअरसोबत असलेली एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीदेखील इंजिनिअर असल्याची माहिती असून सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी इंजिनिअरच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले आहे. श्रीनिवास कुचिभोतला (वय 32 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या इंजिनिअरचे नाव असून जखमी व्यक्तीचे नाव आलोक मदासनी असे आहे. तर अॅडम प्यूरिंटन (वय 51 वर्ष) अशी आरोपीची ओळख पटली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडित भारतीय कुटुंबीयांना मदत करण्यासाठी ह्युस्टनमधील भारतीय दुतावासातील दोन अधिकारी कॅन्सस शहरात दाखल झाले आहेत. ही घटना बुधवारी संध्याकाळी स्थानिक वेळेनुसार 7.15 वाजण्याच्या सुमारास शहरातील एका बारमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणार प्यूरिटन हा नशे होता आणि नशेच्या धुंदीत काहीही बरळत होता. यावेळी बारमधील कर्मचा-याने त्याला रोखण्याचा प्रयत्नही केला. यावेळी 'माझ्या देशातून चालता हो', असा आरडाओरडा करत त्याने श्रीनिवास आणि त्याच्या मित्रावर गोळ्या झाडल्या.
भारतीय इंजिनिअरवर गोळीबार करणार हल्लेखोर अॅडम प्यूरिटन
दरम्यान, या हल्ल्यात मृत पावलेला श्रीनिवास मुळचा हैदराबाद येथील रहिवासी होता. श्रीनिवास आणि त्याचा मित्र अमेरिकेतील एका एव्हिएशन कंपनीत कामाला होते.
I am shocked at the shooting incident in Kansas in which Srinivas Kuchibhotla has been killed. My heartfelt condolences to bereaved family.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) February 24, 2017