भारतीय खाद्य निगमच्या अधिकार्‍याची पोलिसांशी अरेरावी समज देऊन सोडले : दोन ते अडीच तासभर चालला गोंधळ

By admin | Published: March 29, 2016 12:26 AM2016-03-29T00:26:05+5:302016-03-29T00:26:05+5:30

जळगाव : भारतीय खाद्य निगम विभागात उच्च पदावर कार्यरत असणार्‍या एका अधिकार्‍याने सोमवारी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेच्या दरम्यान, शहर वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांशी चांगलीच हुज्जत घालत अरेरावी केली. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यासह वाहतूक शाखेच्या कार्यालयात दोन ते अडीच तास गोंधळ सुरू होता. शेवटी नियम व इशारा भंग केल्याप्रकरणी दंड आकारून त्या अधिकार्‍यास समज देऊन सोडण्यात आले.

The Indian Food Corporation's official gave up the confusion with the police: The mess was going on from two to two and a half hours | भारतीय खाद्य निगमच्या अधिकार्‍याची पोलिसांशी अरेरावी समज देऊन सोडले : दोन ते अडीच तासभर चालला गोंधळ

भारतीय खाद्य निगमच्या अधिकार्‍याची पोलिसांशी अरेरावी समज देऊन सोडले : दोन ते अडीच तासभर चालला गोंधळ

Next
गाव : भारतीय खाद्य निगम विभागात उच्च पदावर कार्यरत असणार्‍या एका अधिकार्‍याने सोमवारी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेच्या दरम्यान, शहर वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांशी चांगलीच हुज्जत घालत अरेरावी केली. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यासह वाहतूक शाखेच्या कार्यालयात दोन ते अडीच तास गोंधळ सुरू होता. शेवटी नियम व इशारा भंग केल्याप्रकरणी दंड आकारून त्या अधिकार्‍यास समज देऊन सोडण्यात आले.
नाशिक जिल्‘ातील रहिवासी असलेला एक उच्चपदस्थ अधिकारी त्याच्या कुटुंबीयांसह कारने जळगाव शहरातून जात होता. महामार्गावर मू.जे. महाविद्यालय चौकात तो कार चालवताना भ्रमणध्वनीवर बोलत होता. त्यामुळे त्याठिकाणी कर्तव्यावर असणारे वाहतूक पोलीस कर्मचारी विजय पाटील व सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले यांनी त्यास हटकले. मात्र, त्याने दोघांना न जुमानता कार सरळ पुढे नेली. उगले यांनी दुचाकीवरून कार अडवण्याचा प्रयत्न केला. कार थांबल्यानंतर अधिकार्‍याने उगले यांच्याशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ केली. म्हणून इतर वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांनी अधिकार्‍याला कारसह जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणले. तेथे राजेंद्र उगले यांनी त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. मात्र, वरिष्ठांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही योग्य तो तोडगा न निघाल्याने दोघांना वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्याकडे पाठवण्यात आले.
अधिकार्‍याचा पाणउतारा
वाहतूक शाखेच्या कार्यालयात चंद्रकांत सरोदे यांनी त्या अधिकार्‍याचा चांगलाच पाणउतारा केला. त्या अधिकार्‍यासोबत त्याची पत्नी व लहान मुलगीदेखील होती. त्याची पत्नी पोलिसांकडे सोडून देण्याची विनंती करत होती. म्हणून पोलिसांनी त्याच्यावर नियम व इशारा भंग केल्याप्रकरणी दंड आकारून त्याला समज देऊन सोडले.

Web Title: The Indian Food Corporation's official gave up the confusion with the police: The mess was going on from two to two and a half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.