भारतीय भूगर्भशास्त्रज्ञांनी समुद्राच्या पोटात शोधला खजिना

By admin | Published: July 17, 2017 01:53 PM2017-07-17T13:53:54+5:302017-07-17T13:53:54+5:30

जिऑलजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी भारतीय द्विपकल्पीय समुद्रात लाखो टनाचे किंमती धातू आणि खनिज असल्याचा शोध लावला आहे.

Indian geologists searched the ocean belly | भारतीय भूगर्भशास्त्रज्ञांनी समुद्राच्या पोटात शोधला खजिना

भारतीय भूगर्भशास्त्रज्ञांनी समुद्राच्या पोटात शोधला खजिना

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 17 - जिऑलजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी भारतीय द्विपकल्पीय समुद्रात लाखो टनाचे किंमती धातू आणि खनिज असल्याचा शोध लावला आहे. 2014 च्या सुरुवातीला मंगळुरु, चेन्नई, मन्नार बासिन, अंदमान, निकोबार बेट आणि लक्षद्वीपच्या समुद्रात मोठया प्रमाणावर साधनसंपत्ती असल्याची माहिती मिळाली होती. 
 
भूगर्भ वैज्ञानिकांना शोध घेताना समुद्रात चिखल, फॉसफेट, काँल्शिअम, हायड्रोकार्बन आणि धातूयुक्त घटक आढळले. अधिक खोलवर शोध घेतल्यास मोठया प्रमाणावर साधनसंपत्ती सापडण्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. तीन वर्षाच्या शोध मोहिमेनंतर जीएसआयने 1,81,025 चौरस किलोमीटरचा हाय रेजॉल्युशन सीबेड मॉरफोलॉजिकल डेटा तयार केला आहे. 
 
आणखी वाचा 
मुंबई : वर्सोव्यात नामांकित शाळेतील महिला कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या
अशिक्षितही लढवू शकतो निवडणूक - सुप्रीम कोर्ट
पाकिस्तानच्या गोळीबारात जवान शहीद, 9 वर्षांची मुलगी ठार
 
कारवार, मंगळुरु आणि चेन्नईच्या समुद्रात फॉसफेटचा गाळ असल्याचेही स्पष्ट झाले आहे. समुद्र रत्नाकर, समुद्र सौदीकामा आणि समुद्र कौस्तूभ या तीन अत्याधुनिक जहाजांच्या मदतीने ही शोध मोहिम राबवण्यात आली.  संभाव्य खनिज संपत्तीच्या स्थळांचा शोध घेणे आणि खनिज स्त्रोतांचा अभ्यास करणे हे दोन मुख्य उद्देश होते असे जिऑलजिकल सर्वे ऑफ इंडियाचे अधिक्षक आशिष नाथ यांनी सांगितले. 
 

Web Title: Indian geologists searched the ocean belly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.