दहशतवाद्यांसोबत गँगस्टर रचताहेत मोठा कट! अमेरिकेने इशारा दिला, भारताने मोठी कारवाई केली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 03:48 PM2023-11-29T15:48:34+5:302023-11-29T15:51:36+5:30
अमेरिकेत एका शीख अतिरेक्याला ठार मारण्याच्या कटाशी संबंधित आरोपांच्या चौकशीसाठी भारताने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे.
अमेरिकेत एका शीख अतिरेक्याला ठार मारण्याच्या कटाशी संबंधित आरोपांच्या चौकशीसाठी भारताने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. फायनान्शिअल टाईम्सने गेल्या आठवड्यात अज्ञात स्त्रोतांचा हवाला देऊन अहवाल दिला की, गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट अमेरिकन अधिकार्यांनी हाणून पाडला आणि या कटात सहभागी असल्याबाबत भारत सरकारला इशारा जारी केला.
गरिबांना आणखी ५ वर्षे मोफत रेशन मिळणार; मोदी मंत्रिमंडळाने घेतले 'हे' मोठे निर्णय...
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारताने या प्रकरणातील सर्व संबंधित पैलूंवर लक्ष ठेवण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. पन्नू हा शीख अतिरेकी असून त्याच्याकडे अमेरिका आणि कॅनडाचे नागरिकत्व आहे. भारतीय तपास यंत्रणा विविध दहशतवादाच्या आरोपाखाली त्याचा शोध घेत आहेत.
अरिंदम बागची म्हणाले, "आम्ही आधीच सांगितले आहे की द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याबाबत अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेदरम्यान, अमेरिकेने संघटित गुन्हेगार, बंदूक चालवणारे, दहशतवादी आणि इतर यांच्यातील संबंधासंबंधी काही माहिती शेअर केली होती."
"आम्ही असेही सूचित केले आहे की, भारत अशा प्रकारची माहिती गांभीर्याने घेतो कारण ती आमच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हितांवर परिणाम करते आणि संबंधित विभाग आधीच या प्रकरणाची चौकशी करत आहेत." या संदर्भात, अशी माहिती आहे की १८ नोव्हेंबर रोजी भारत सरकारने या प्रकरणातील सर्व संबंधित पैलूंवर लक्ष ठेवण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे,” अशी माहिती अरिंदम बागची यांनी दिली.
समितीच्या निष्कर्षांच्या आधारे भारत आवश्यक ती कारवाई करेल, फायनान्शिअल टाईम्सच्या अहवालाच्या आठवडे आधी, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी जूनमध्ये व्हँकुव्हर उपनगरात खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा “संभाव्य” सहभाग असल्याचा आरोप केला होता. भारताने ट्रुडो यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते. मात्र, या घटनेनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता, असंही अरिंदम बागची म्हणाले.