गानसम्राज्ञीच्या सन्मानार्थ सरकारकडून टपाल तिकीट जारी करण्यात येणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 06:37 PM2022-02-07T18:37:55+5:302022-02-07T19:21:10+5:30
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या सन्मानार्थ भारत सरकार टपाल तिकीट जारी करणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ही माहिती दिली.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या सन्मानार्थ भारत सरकार टपाल तिकीट जारी करणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. वैष्णव यांच्याकडे रेल्वेसह दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभार आहे.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे काल रुग्णालयात दीर्घ उपचारानंतर निधन झाले. यानंतर केंद्र सरकारनं दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्वतः काल मुंबईत जाऊन लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. आता भारतरत्न पुरस्कारानं (Bharat Ratna Award) सन्मानित दिवंगत गायकाच्या स्मरणार्थ सरकार टपाल तिकीट काढण्याच्या तयारीत असल्याचे मंत्री वैष्णव यांनी सांगितले.
रेल्वे भरतीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री म्हणाले, पुढील वेळेपासून भरती प्रक्रिया अधिक चांगली होणार असून रेल्वे भरती परीक्षा (Railway Recruitment Examination) पद्धतशीर होण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. रेल्वेबाबत बोलताना वैष्णव यांनी सांगितलं की, प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यास सरकार प्रयत्नशील आहे. प्रवाशांच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: यात लक्ष घालत असून लवकरच विविध धोरणांची अंमलबजावणी केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.