Breaking : पाकिस्तानमधून 2 भारतीय उच्चायुक्त गायब, मोदी सरकारने विचारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 11:40 AM2020-06-15T11:40:59+5:302020-06-15T11:57:36+5:30
इस्लामाबाद येथून यापूर्वीही भारतीय अधिकारी गौरव अहलूवालिया यांना त्रास देण्यात येत असल्याचं समोर आलं होतं.
नवी दिल्ली - पाकिस्तानमधून दोन भारतीय उच्चायुक्त गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद येथे कार्यरत असलेले भारतीय उच्चायुक्तालयातील दोन अधिकारी अचानक गायब झाले आहेत. गेल्या २ तासांपासून हे अधिकारी कुणाच्याही संपर्कात नाहीत, त्यामुळे भारतीय उच्च आयोगाने पाकिस्तानी अधिकाऱ्यांसमोर यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.
इस्लामाबाद येथून यापूर्वीही भारतीय अधिकारी गौरव अहलूवालिया यांना त्रास देण्यात येत असल्याचं समोर आलं होतं. गौरव यांच्या गाडीचा दुचाकीवरुन पाठलाग करण्यात येत होता. त्यानंतर, आज दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गायब होण्याचे वृत्त आले असून भारतीय उच्च आयोगाने पाकिस्तानला याबाबत विचारणा केली आहे. त्यानंतर, पाकिस्तानकडून शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. मात्र, अशाप्रकारे भारतीय राजपत्रित अधिकाऱ्यांचे गायब होणे हे पाकिस्तानकडून होणाऱ्या त्रासदायक वृत्तीचे उदाहरण आहे.
Two Indian High Commission officials in Pakistan missing since last two hours; Matter taken up with Pakistan authorities pic.twitter.com/UfuV6Imfrz
— DD News (@DDNewslive) June 15, 2020