भारतीय गिर्यारोहकाचा चिलीत मृत्यू

By admin | Published: April 5, 2015 01:19 AM2015-04-05T01:19:47+5:302015-04-05T01:19:47+5:30

सात देशांतील सात पर्वतशिखरे १७२ दिवसांत सर करून गिनीज बुकात स्थान मिळविणारा भारतीय गिर्यारोहक मल्ली मस्तान बाबू याचा मृतदेह अँडीज पर्वतराजीत आढळला.

Indian hiker killed in Chile | भारतीय गिर्यारोहकाचा चिलीत मृत्यू

भारतीय गिर्यारोहकाचा चिलीत मृत्यू

Next

जगभर नावलौकिक : अँडीज पर्वतराजीत आढळला मृतदेह
नेल्लोर (आंध्र प्रदेश) : सात देशांतील सात पर्वतशिखरे १७२ दिवसांत सर करून गिनीज बुकात स्थान मिळविणारा भारतीय गिर्यारोहक मल्ली मस्तान बाबू याचा मृतदेह अँडीज पर्वतराजीत आढळला. २४ मार्चपासून तो बेपत्ता होता.
त्याचा शोध घेण्यासाठी चिलीमधील भारतीय दूतावासाच्या विनंतीनुसार या पर्वतराजीत शोध घेण्यात आला असता हेलिकॉप्टरने शोध घेणाऱ्या पथकाला मल्ली बाबूचा मृतदेह आढळल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. उंच पर्वतशिखरे पादाक्रांत करून स्वत:सह कुटुंबाला गौरव मिळवून देणाऱ्या धाडसी मुलाच्या मृत्यूची वार्ता ऐकताच त्याच्या आईवर दु:खाचा डोंगरच कोसळला. जगभरातील अनेक पर्वतशिखरे सर करून जगभर
लौकिक मिळविणारा मल्ली मस्तान बाबू माऊंट एव्हरेस्ट शिखर चढणारा आंध्र प्रदेशातील पहिला गिर्यारोहक होता.

खराब हवामानामुळे जोरदार पाऊस आणि वादळ आल्याने या मोहिमेतील त्याच्यासोबतचे तिघेजण माघारी परतले होते; परंतु मल्ली मस्तान बाबू न डगमगता मोहीम फत्ते करण्याच्या इराद्याने तेथेच थांबला. तो सुखरूप परत येईल, असा आत्मविश्वास त्याच्या कुटुंबियांना होता. अनेक दिवस उलटल्यानंतरही तो न परतल्याने त्याचा शोध घेण्यात आला असता त्याचा मृतदेह आढळून आला. ही दु:खद वार्ता कळताच गांधी जन संगम या त्याच्या मूळ गावावर शोककळा पसरली.

Web Title: Indian hiker killed in Chile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.