भारतीय हॉकी संघ जाहीर
By admin | Published: September 5, 2014 02:08 AM2014-09-05T02:08:09+5:302014-09-05T02:08:09+5:30
भारताने इंचियोनमध्ये आयोजित आशियाई स्पर्धेसाठी पुरुष हॉकी संघ जाहीर केला
Next
नवी दिल्ली : भारताने इंचियोनमध्ये आयोजित आशियाई स्पर्धेसाठी पुरुष हॉकी संघ जाहीर केला असून ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक पटकाविणारा 16 सदस्यांचा संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हॉकी इंडियाने आज मिडफिल्डर सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली 16 सदस्यांच्या संघाची घोषणा केली असून, हा संघ 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित 17व्या आशियाई स्पर्धेत सहभागी होणार आहे. निवड समिती सदस्य बी. पी. गोविंदा, हरविंदर सिंग, आर. पी. सिंग व अजरुन हलप्पा यांच्यासह हायपरफॉर्मेन्स संचालक रोलेंट ओल्टमेन्स व मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी राष्ट्रकुल स्पर्धा, बांगलादेश दौरा व 11 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या
निवड चाचणीनंतर संघाची निवड केली, असे हॉकी इंडियातर्फे स्पष्ट करण्यात आले. संघात एकमेव गोलकिपर पी. आर. श्रीजेश असून, त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
ग्वांग्झूमध्ये कांस्यपदक जिंकणा:या भारतीय संघाला सलामी लढतीत 21 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर 23 सप्टेंबरला ओमानविरुद्ध, 25 सप्टेंबरला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आणि 27 सप्टेंबर रोजी चीनविरुद्ध खेळावे लागणार आहे. भारतीय
संघ 12 सप्टेंबरला कोरियाला रवाना होईल. (वृत्तसंस्था)
गोलकिपर : पी. आर. श्रीजेश, डिफेंडर - गुरबाज सिंग, बीरेंद्र लाकडा, रुपिंदरपाल सिंग, कोथाजित सिंग, व्ही. आर. रघुनाथ. मिडफिल्डर - धरमवीर सिंग, सरदार सिंग, दानिश मुज्तबा, चिंग्लेनसाना सिंग, मनप्रित सिंग. फॉरवर्ड : रमनदीप सिंग, आकाशदीप सिंग, एस. व्ही. सुनील, गुरविंदरसिंग चांडी,
नितीन थिमैया.