“कोणत्या रुग्णालयात उपचारांसाठी पतंजलीचे औषध दिले”; IMA चे बाबा रामदेव यांना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 03:06 PM2021-05-29T15:06:07+5:302021-05-29T15:07:53+5:30

‘IMA उत्तराखंड’ यांनी बाबा रामदेव यांना चॅलेंज दिले असून, खुल्या चर्चेसाठी येण्यास सांगितले आहे.

indian medical association uttarakhand has challenged yog guru ramdev for a debate | “कोणत्या रुग्णालयात उपचारांसाठी पतंजलीचे औषध दिले”; IMA चे बाबा रामदेव यांना चॅलेंज

“कोणत्या रुग्णालयात उपचारांसाठी पतंजलीचे औषध दिले”; IMA चे बाबा रामदेव यांना चॅलेंज

Next
ठळक मुद्दे‘IMA उत्तराखंड’चे बाबा रामदेव यांना चर्चेसाठी आव्हानकोणत्या रुग्णालयात उपचारांसाठी पतंजलीचे औषध दिलेयोगगुरू बाबा रामदेव आणि IMA मधील वाद वाढण्याची चिन्हे

देहरादून: गेल्या काही दिवसांपासून अॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीवरून बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये वाद सुरू आहे. बाबा रामदेव यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आयएमएने पलटवार केला आहे. बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा आणि अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. यातच आता ‘IMA उत्तराखंड’ यांनी बाबा रामदेव यांना चॅलेंज दिले असून, खुल्या चर्चेसाठी येण्यास सांगितले आहे. (indian medical association uttarakhand has challenged yog guru ramdev for a debate) 

योगगुरू बाबा रामदेव आणि IMA मधील वाद वाढताना दिसतोय. इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यांची योगगुरू बाबा रामदेव यांनी खिल्ली उडवली आहे. ज्यांना काही मान नाही, असे लोक एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करत आहेत, अशा शब्दात स्वामी रामदेव यांनी आयएमएवर निशाणा साधला आहे. या दरम्यान उत्तराखंडमधील इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी बाबा रामदेव यांना आव्हान दिले आहे.

कोणत्या रुग्णालयात उपचारांसाठी पतंजलीचे औषध दिले

योगगुरू बाबा रामदेव यांनी कोणत्या अॅलोपॅथी रुग्णालयामध्ये पतंजलींचे औषध उपचारांसाठी दिले आहे, अशी विचारणा करत सार्वजनिक चर्चेसाठी बाबा रामदेव यांनी पॅनलसमोर उपस्थित व्हावे, असे आव्हान ‘IMA उत्तराखंड’ यांनी दिले आहे. एका कार्यक्रमावेळी बाबा रामदेव यांनी कोरोनावरील उपचारासाठी अॅलोपॅथी रुग्णालयात पतंजलीची औषधे वापरली जात असल्याचा दावा केला होता. यानंतर ‘IMA उत्तराखंड’ ने कोरोनाच्या उपचारासाठी कोणत्या रुग्णालयाला पतंजलीचे औषध दिले, असा प्रतिप्रश्न केला आहे.   

ज्यांना काही 'मान' नाही, असे लोक करतायत 'मानहानी'चा दावा; बाबा रामदेवांचा निशाणा

दरम्यान, आमची कुठल्याही पॅथीसोबत कॉम्पिटिशन नाही, विरोध नाही. आकस्मिक स्थितीत अॅलोपॅथी उपचार आवश्यक असल्याचेही आपण मानतो, मान्यताही देतो. पण याचा अर्थ असा नाही, की केवळ हीच उपचार पद्धती आहे. अॅलोपॅथिक उपचार पद्धतीवर निशाणासाधत ते म्हणाले, आम्ही मानतो, की आपल्याकडे लाइफ सेव्हिंग ड्रग्स आणि अॅडव्हान्स सर्जरी आहे. पण आपल्याकडे या दोन गोष्टी असतील, तर आमच्याकडे 98 गोष्टी आहेत. आयुर्वेद आणि निसर्गोपचार सर्जरी न करता आणि औषध न घेताच उत्तम आरोग्य देते. आणि एक हजाराहून अधिक व्याधींवर इलाज करते, असा दावाही बाबा रामदेव यांनी केला.  
 

Web Title: indian medical association uttarakhand has challenged yog guru ramdev for a debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.