फेसबुकवरही भारतीय सैन्य लय भारी
By admin | Published: August 9, 2015 05:35 PM2015-08-09T17:35:28+5:302015-08-09T17:35:28+5:30
रणभूमीत शत्रूंची दाणादाण उडवणा-या भारतीय सैन्याने आता सोशल नेटवर्किंग साईट्सवरही अन्य देशांच्या सैन्यांना मागे टाकून लोकप्रियतेचा शिखर गाठला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - रणभूमीत शत्रूंची दाणादाण उडवणा-या भारतीय सैन्याने आता सोशल नेटवर्किंग साईट्सवरही अन्य देशांच्या सैन्यांना मागे टाकून लोकप्रियतेचा शिखर गाठला आहे. फेसबुकवर 'पीपल टॉकिंग अबाऊट दॅट' यात भारतीय सैन्य सलग दुस-यांना अव्वल स्थानावर आहे.
फेसबुकवर सीआयए, नासा, एफबीआय, पाकिस्तानी सैन्या अशा असंख्य विदेशी सरकारी विभागांची पेजेस आहेत. फेसबुकवर पेजेसची लोकप्रियता त्याच्या टॉकिंग पॉईंटवरुन ठरवली जाते. पेजवर किंवा त्या पेजवर भाष्य करणारी लोकं किती या आधारे हा टॉकिंग पॉईंट काढला जातो. टॉकिंग पॉईंटनुसार भारतीय सैन्याचे पेज हे सर्वात लोकप्रिय ठरले आहे. जून २०१३ मध्ये सैन्याने फेसबुकवर अधिकृत पेज सुरु आहे. या पेजला २९ लाख लाईक्स मिळाले आहेत. फेसबुकप्रमाणेच भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईटलाही भरभरुन प्रतिसाद मिळतो. सैन्याच्या वेबसाईटला दररोज सरासरी २५ लाख हिट्स मिळतात असे सैन्याच्या अधिका-यांनी सांगितले. भारत - पाकिस्तान सैन्यामधील युद्ध फेसबुकवरही पाहायला मिळते. या दोन्ही देशांनी एकमेकांच्या फेसबुकवर पेजवर बंदी टाकली आहे. म्हणजेच पाकिस्तानातील व्यक्ती भारतीय सैन्याचे पेज तर पाकिस्तानी सैन्याचे भारतातील व्यक्ती बघू शकत नाही.