पाकमध्ये चुकून पडले भारताचे क्षेपणास्त्र; अडविता न आल्याने झाला तिळपापड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 06:27 AM2022-03-12T06:27:05+5:302022-03-12T06:27:20+5:30
ही घटना ९ मार्चला सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली हाेती. नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक चुकीमुळे एक क्षेपणास्त्र डागले गेले आणि ते पाकिस्तानी हद्दीत १२४ किलाेमीटरवर पडले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताचे एक क्षेपणास्त्र चुकीने पाकिस्तानात जाऊन पडल्यामुळे खळबळ उडाली आहे. संरक्षण मंत्रालयाने यास दुजाेरा दिला असून, तांत्रिक चुकीने क्षेपणास्त्र डागले गेल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने या घटनेची अतिशय गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी काेर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत, तर पाकिस्तानने या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून, भारताने उत्तर देण्याची मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना ९ मार्चला सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली हाेती. नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक चुकीमुळे एक क्षेपणास्त्र डागले गेले आणि ते पाकिस्तानी हद्दीत १२४ किलाेमीटरवर पडले. त्यावर काेणतीही शस्त्रे किंवा स्फाेटके नव्हती. त्यामुळे काेणतीही प्राणहानी झालेली नाही, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. मात्र, संरक्षण मंत्रालयाने या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून, चाैकशीचे आदेश दिले आहेत.
भारताचे एखादे विमान मुलतान भागात मियां चन्नू येथे काेसळल्याच्या बातम्या पाकिस्तानी माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या हाेत्या. पाकिस्तानी लष्करानेही या ठिकाणाचा उल्लेख केला हाेता. या घटनेमुळे काही इमारतींचे नुकसान झाले. क्षेपणास्त्र डागले गेले त्यावेळी भारत आणि पाकिस्तानी हवाई हद्दीत अनेक प्रवासी विमाने हाेती. क्षेपणास्त्र ४० हजार फूट उंचीवर हाेते, तर विमाने ३५ ते ४२ हजार फूट उंचीवर हाेती. त्यामुळे माेठ्या अपघाताचीही शक्यता हाेती.
ते क्षेपणास्त्र ब्रह्माेस असल्याचा दावा
क्षेपणास्त्र कोणते होते, याबाबत भारताने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, जे क्षेपणास्त्र पाकिस्तानात पडले ते सुपरसाॅनिक क्षेपणास्त्र ‘ब्रह्माेस’ असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
हे जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्र असून त्याचा ताशी २५०० किलाेमीटर वेग आहे. याचा साठा राजस्थानातील श्रीगंगानगर येथे ठेवण्यात आला आहे. परंतु, ते सिरसा येथून डागण्यात आल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. ब्रह्मोस भेदणे अशक्य असल्यामुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे.
क्षेपणास्त्र जरी चुकीने सुटले असले तरीही पाकिस्तानी एअर डिफेन्स यंत्रणेला ते ट्रॅक तर करता आले; परंतु भेदता आलेले नाही.
क्षेपणास्त्र ४० हजार फुट उंचीवर हाेते. तर विमाने ३५ ते ४२ हजार फुट उंचीवर हाेती. त्यामुळे माेठ्या अपघाताचीही शक्यता हाेती.