Indian Navy Vacancy: शेवटचे दोन दिवस शिल्लक; नौदलात नोकरीची मोठी संधी साधली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 06:58 PM2020-12-29T18:58:23+5:302020-12-29T18:59:31+5:30

Indian Navy vacancy 2021: टेक्निकल आणि ऩॉन-टेक्निकल अशा दोन्ही जागांवर भरती होणार आहे. यासाठीचे नोटिफिकेशन काही दिवसांपूर्वीच काढण्यात आले आहे. आता अर्ज करण्याची शेवटची संधी उरली आहे. 

Indian Navy job: Last two days remaining; Did you apply in Indian Navy? | Indian Navy Vacancy: शेवटचे दोन दिवस शिल्लक; नौदलात नोकरीची मोठी संधी साधली का?

Indian Navy Vacancy: शेवटचे दोन दिवस शिल्लक; नौदलात नोकरीची मोठी संधी साधली का?

googlenewsNext

Indian Navy vacancy 2021: भारतीय नौदलामध्ये अनेक पदांवर भरती जाहीर झाली आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स एन्ट्री (Navy SSC Entry) द्वारे टेक्निकल आणि ऩॉन-टेक्निकल अशा दोन्ही जागांवर भरती होणार आहे. यासाठीचे नोटिफिकेशन काही दिवसांपूर्वीच काढण्यात आले आहे. आता अर्ज करण्याची शेवटची संधी उरली आहे. 


पदाचे नाव - एसएससी ऑफिसर
पदांची संख्या - 210
पे स्केल - 56,100 ते 1,10,700 (लेव्हल-10)

पदांचे विवरण 
एग्जीक्यूटिव ब्रँच

एसएससी जनरल सर्विस / हायड्रो केयर - 40 पद
एसएससी नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) - 16 पद
एसएससी ऑब्जर्व्हर - 06 पद
एसएससी पायलट - 15 पद
एसएससी लॉजिस्टिक्स - 20 पद
एसएससी एक्स (आईटी) - 25 पद

टेक्निकल ब्रँच 
एसएससी इंजीनियरिंग ब्रँच  - 30 पद
एसएससी इलेक्ट्रिकल ब्रँच  - 40 पद

एज्युकेशन ब्रँच - 18 पद


शैक्षणिक अट 
एक्झिक्युटीव्ह व टेक्निकल ब्रँचसाठी बीई किंवा बीटेकची डिग्री असणे गरजेचे आहे. 2 जुलै 1996 ते 1 जानेवारी 2002 या कालावधीत जन्म असायला हवा. 


अर्ज कसा कराल? 
नौदलात एसएससी एन्ट्री 2021 साठी joinindiannavy.gov.in वर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 18 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. कोणतेही अर्ज शुल्क नाही. 

डायरेक्ट लिंक्स...


Indian Navy Job Notification 2021 साठी इथे क्लिक करा...

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...

Indian Navy च्या वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा...

 

Government Jobs: मोठ्या सरकारी बँकांमध्ये काम करण्याची संधी; चार ठिकाणी नोकरीचे पर्याय

एकीकडे स्पर्धा वाढत असताना आता सरकारी नोकऱ्या मिळणे मुश्किल झाले आहे. त्यापेक्षाही जास्त कठीण म्हणजे तिथे भरती आहे हे वेळेवर समजणे. सध्या एलआयसी, आयडीबीआय, एसबीआय आणि बँक ऑफ बडोदामध्ये जागा सुटलेल्या आहेत. एलआयसीसाठी अर्ज भरायला तर फक्त तीन दिवस उरले आहेत. वेळेत जर हे समजले तर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

LICHFL Vacancy 2020: जीवन बीमा निगम (LIC) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (HFL) भरती निघाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनीपासून  असिस्टंट मॅनेजर या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांचे वार्षिक पे स्केल १४ लाख रुपयांपर्यंत असणार आहे. जर तुम्ही एमसीए, बीएससी, बीटेक किंवा बीईची डिग्री घेतली असेल  तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या पदांवर अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली दिली जात आहे. 

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा... 

Web Title: Indian Navy job: Last two days remaining; Did you apply in Indian Navy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.