JOB Alert : गुड न्यूज! 10 वी पास असणाऱ्यांसाठी Indian Navy मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; आजच करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 04:15 PM2021-08-22T16:15:59+5:302021-08-22T16:24:57+5:30
Indian Navy Recruitment 2021 : भारतीय नौदलात दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय नौदलात (Indian Navy Recruitment 2021) दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. नौदलाच्या नेव्हल शिप रिपेअर शिपयार्डमध्ये लवकरच तब्बल 300 जागांवर मेगाभरती होणार आहे. याबाबत नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे. याअंतर्गत मशीनिस्ट, प्लंबर, पेंटर, टेलर, वेल्डर, मॅकेनिक, इलेक्ट्रिशियनसारख्या पदांवर भरती होणार आहे. यासाठी इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
जागा
मशीनिस्ट - 16
प्लंबर/पाइप फिटर - 08
पेंटर- 07
टेलर- 06
वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक)- 20
मॅकेनिक एमटीएम- 07
वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) शिप फिटर- 03
शीट मेटल वर्कर- 01
इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक (रेडियो फिटर, इलेक्ट्रिक फिटर, कंप्यूटर फिटर) - 33
इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक (गायरो/मशीनरी कंट्रोल फिटर ) -13
JOB Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता गुड न्यूज; जाणून घ्या, कसा, कुठे करायचा अर्ज?#Jobs#JOBAlert#bankhttps://t.co/8JcTuEKkyp
— Lokmat (@MiLOKMAT) August 19, 2021
इलेक्ट्रिशियन- 29
इंस्ट्रूमेंट मॅकेनिक - 08
फिटर - 37
मॅकेनिक डिझेल - 42
रेफ्रीजेटर आणि एसी मॅकेनिक - 11
शीट मेटल वर्कर - 18
कारपेंटर - 33 पद
मॅसन (बिल्डिंग कंस्ट्रक्टर) 07
इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक- 01
JOB Alert : खूशखबर! 34,000 रुपये पगार मिळणार; जाणून घ्या, कसा अन् कुठे करायचा अर्ज?#JobAlert#bank#IDBIBankRecruitment2021https://t.co/WNsaYbUz6V
— Lokmat (@MiLOKMAT) August 4, 2021
शैक्षणिक पात्रता
- दहावी पास असण्यासोबतच नेव्हल पोस्ट यार्डमध्ये अप्रेंटिस करणं गरजेचं आहे.
- इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- जर अप्रेंटिस केली नसेल तर भारतीय सैन्याच्या तांत्रिक शाखेत मेकॅनिक किंवा त्यासारख्याच इतर पदावर किमान दोन वर्षे सर्व्हिस करणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
18 ते 25 वर्षे
असा करा अर्ज
यासाठी ऑफलाईन अर्ज करता येतो. अर्ज हा स्पीड पोस्टने THE COMMODORE SUPERINTENDENT (FOR Oi/C RECRUITMENT CELL), NAVAL SHIP REPAIR YARD (PBR), POST BOX NO. 705, HADDO, PORT BLAIR – 744102”, SOUTH ANDAMAN या पत्त्यावर पाठवा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
JOB Alert : खूशखबर! सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कधी करायचा अर्ज?#job#JobAlert#India#Engineerhttps://t.co/JRdKlUba0U
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2021