पाकिस्तानी व्यक्तीसाठी भारतीय नौदल सरसावले, समुद्रात शस्त्रक्रिया करुन वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 21:02 IST2025-04-06T21:01:45+5:302025-04-06T21:02:51+5:30

Indian Navy Helps Baloch Fisherman: आयएनएस त्रिकंदवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाचवला जीव.

Indian Navy rushed to rescue Pakistani man, performed surgery at sea to save his life | पाकिस्तानी व्यक्तीसाठी भारतीय नौदल सरसावले, समुद्रात शस्त्रक्रिया करुन वाचवले प्राण

पाकिस्तानी व्यक्तीसाठी भारतीय नौदल सरसावले, समुद्रात शस्त्रक्रिया करुन वाचवले प्राण

Indian Navy Helps Pakistani Fisherman: अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ मासेमारी करणाऱ्या पाकिस्तानी जहाजावरील कर्मचारी जखमी झाला, त्या कर्मचाऱ्याला भारतीय नौदलाने तात्काळ वैद्यकीय मदत दिली आणि त्याचे प्राण वाचवले. 

नौदलाने रविवारी (6 एप्रिल 2025) रोजी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाच्या INS त्रिकंदला शुक्रवारी इराणी बोट अल ओमिदीकडून एक इमरजन्सी संदेश प्राप्त झाला. यानंतर नौदलाने ओमान किनारपट्टीच्या पूर्वेला सुमारे 350 सागरी मैल अंतरावर जखमी झालेल्या पाकिस्तानी क्रू मेंबरची मदत केली. 

नौदलाने एका प्रकाशनात म्हटले आहे की, इंजिनवर काम करताना पाकिस्तानी बोटीचा क्रू मेंबर जखमी झाला होता. त्याच्या बोटांना गंभीर दुखापत झाली होती. त्याला तात्काळ इराणला जाणाऱ्या एफव्ही अब्दुल रहमान हंजिया या दुसऱ्या बोटीवर हलवण्यात आले.

यानंत मेसेज मिळताच त्रिकंदने जखमी क्रू मेंबरला वैद्यकीय मदत देण्यासाठी लगेच मार्ग बदलला. एफव्ही अब्दुल रहमान हांजियाच्या क्रूमध्ये 11 पाकिस्तानींचा समावेश होता. त्यात बलुचिस्तानमधील नऊ आणि सिंध प्रांतातील दोन. याशिवाय इराणचे पाच जवानही उपस्थित होते. 

यातील बलुचिस्तानचा एक सदस्य जखमी झाला होता. त्याचे हाड मोडून हाताला गंभीर दुखापत झाली होती, परिणामी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. आयएनएस त्रिकंदचे वैद्यकीय अधिकारी, मार्कोस (मरीन कमांडो) आणि जहाजाच्या 'बोर्डिंग टीम'च्या पथकाने जखमीला तात्काळ वैद्यकीय मदत पुरवली आणि त्याचा जीव वाचवला.

Web Title: Indian Navy rushed to rescue Pakistani man, performed surgery at sea to save his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.