भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मच्छिमारांची बोट धडकली, ११ जण बचावले; दोघांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 03:37 PM2024-11-22T15:37:19+5:302024-11-22T15:41:48+5:30
भारतीय नौदलाची पाणबुडी PM 21 गोव्याच्या किनाऱ्यापासून उत्तर-पश्चिम ७० नॉटिकल मैल अंतरावर भारतीय जहाज मार्थोमाशी टक्कर झाली. मासेमारीच्या जहाजावर १३ जणांचा ताफा होता, असे सांगण्यात येत आहे. यातील ११ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
गोव्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गोव्याच्या वायव्येकडील समुद्रात भारतीय नौदलाच्या पाणबुडीशी अपघात झाला. भारतीय नौदलाच्या पाणबुडीची मार्थोमा या भारतीय मासेमारी जहाजाशी टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मासेमारीच्या जहाजावर १३ जणांचा ताफा होता. भारतीय नौदलाने ११ जणांची सुखरूप सुटका केली आहे. इतर दोन जणांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेनंतर संरक्षण मंत्रालयाकडून निवेदनही समोर आले आहे.
भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
२१ नोव्हेंबर २०२४ रोजी गोवा किनाऱ्याच्या वायव्येला सुमारे ७० नॉटिकल मैल अंतरावर भारतीय नौदलाच्या पाणबुडी पीएम २१ शी टक्कर झालेल्या मार्थोमा या भारतीय जहाजाच्या दोन क्रू सदस्यांसाठी बचावकार्य सुरू आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. प्रयत्नांना चालना देण्यासाठी तटरक्षक दलासह अतिरिक्त संसाधने या भागात पाठवण्यात आल्याचे पुढे सांगण्यात आले.
गुरुवारी संध्याकाळी भारतीय नौदलाची पाणबुडी आणि भारतीय मासेमारी जहाज मार्थोमा यांच्यात टक्कर झाली. गोव्याच्या किनाऱ्यापासून ७० सागरी मैल अंतरावर ही घटना घडली. घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत ११ जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्याचबरोबर अन्य २ जणांचा शोध सुरू आहे.
या घटनेनंतर बचाव कार्यात मदत करण्यासाठी सुरुवातीला सहा जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली होती. भारतीय नौदलाने सांगितले की, मुंबईतील सागरी बचाव समन्वय केंद्राशी समन्वय साधला जात आहे. बचाव कार्य अधिक तीव्र करण्यासाठी अतिरिक्त मालमत्ता देखील पाठवण्यात येत आहे.
ही धडक नेमकी कशामुळे झाली याचा सध्या शोध सुरू आहे. भारतीय नौदलाने अद्याप उर्वरित दोन क्रू मेंबर्सची प्रकृती किंवा सहभागी जहाजाच्या स्थितीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.