भारतीय नौदल चीनचे टेन्शन वाढवणार! २०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 01:33 PM2023-03-13T13:33:19+5:302023-03-13T13:34:29+5:30
भारतीय नौदलात युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांबाबत मोठा प्रस्ताव देण्यात आला आहे.
समु्द्रात भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. नौदल यासाठी २० हजार कोटी रुपयांच्या डिल करणार आहे. संरक्षण मंत्रालयात ही प्रक्रिया जवळपास प्राथमिक अवस्थेत आहे. लवकरच या संदर्भात संरक्षण अधिग्रहण परिषदेसोबतही बैठक होणार आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे मुख्य शस्त्र आहे जे समुद्रात शत्रूच्या जहाजांवर हल्ला करण्यासाठी वापरले जाते. या क्षेपणास्त्रामुळे आता चीनचे टेन्शन वाढणार आहे.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे युद्धनौकांवर तैनात केली जातील. अलीकडेच कोलकाता श्रेणीतील युद्धनौकेवरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. यासाठी अपग्रेडेड मॉड्युर लाँचरचा वापर करण्यात आला. ब्रह्मोस एरोस्पेस भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे. भारतीय नौदल स्वावलंबनाकडे पावले टाकत आहे. भारतीय नौदल जहाजांवर स्वदेशी साधक बसवणार आहे. ते डीआरडीओने तयार केले आहे.
'हिंदूंच्या घरात दोन मुले असतील तर एकाला रामनवमीच्या मिरवणुकीत पाठवा', धीरेंद्र शास्त्रींचं विधान
क्षेपणास्त्रांव्यतिरिक्त, ब्रह्मोस एरोस्पेस पाणबुडी, जहाजे, विमाने आणि लँड प्लॅटफॉर्म देखील बनवते. नौदलाने २०० ब्रह्मोस प्रस्तावित केले आहेत. त्याचबरोबर क्षेपणास्त्राचा स्ट्राइक रेटही वाढवण्यात आला आहे. पूर्वी ते २९० किलोमीटरपर्यंत हल्ला करायचे पण आता त्याची क्षमता ४०० किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय त्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारतीय उपकरणे वाढवण्यात आली आहेत.
या क्षेपणास्त्राची फिलिपाइन्ससारख्या देशांमध्ये निर्यातही केली जाते. हे क्षेपणास्त्र भारताच्या DRDO आणि रशियाच्या फेडरल स्टेट युनिटरी एंटरप्राइझच्या कराराने बनवले आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र जहाज, पाणबुडी, विमान आणि जमिनीवरून डागता येते. हे जगातील सर्वात वेगवान जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्र आहे. पाण्याखाली ४० मीटर खोलीतूनही ते उडवले जाऊ शकते.