Indian Navy: भारताची अण्वस्त्र हल्ला करू शकणारी एकमेव पानबुडी रशियाला परतली; काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 12:35 PM2021-06-05T12:35:18+5:302021-06-05T12:37:39+5:30
Ins chakra Returns To Russia: आयएनएस चक्र रशियाला परततानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सिंगापूरच्या समुद्रातून ही पानबुडी थेट रशियाला निघाली आहे.
भारतीय नौदलाच्या (Indian Navy) ताफ्यात असलेली व अण्वस्त्र हल्ले करू शकणारी एकमेव पानबुडी आयएनएस चक्र (INS Chakra) रशियाला (Russia) परत गेली आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अकुला क्लासची ही पानबुडी 2012 मध्ये रशियाकडून भाडेकरारवर घेण्यात आली होती. अण्वस्त्र क्षमता असलेली रशियाकडून घेण्यात आलेली ही भारताची दुसरी पानबुडी होती. ( Indian Navy's only nuclear powered attack submarine, the INS Chakra, in the waters of the Singapore Straits heralds the end of her service in the Indian Navy.)
सुत्रांनी सांगितले की, आयएनएस चक्र पुन्हा रशियाला परतत आहे कारण तिचे लीज संपले आहे. या आधी 1988 मध्ये तीन वर्षांसाठी रशियाकडून अशीच एक पानबुडी भाड्याने घेण्यात आली होती. तिचे नावही आयएनएस चक्र होते.
Some really exciting traffic in the Singapore Strait today, Indian Navy's INS Chakra Akula-II-class SSN and Delhi-class DDG!! Many thanks to my fellow warship spotters @supbrow and Jaime fir heads up and company! pic.twitter.com/4d8oiMV4ck
— Olli Suorsa (@OlliSuorsa) June 4, 2021
आयएनएस चक्र रशियाला परततानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतू, अद्याप कोणतीही अधिकारीक माहिती समोर आलेली नाही. 2019 मध्ये भारताने रशियासोबत 10 वर्षांसाठी अण्वस्त्र पाणबुडी भाड्याने घेण्यासाठी 3 अब्ज डॉलरचा करार केला होता. यानुसार 2025 पर्यंत रशिया भारतीय नौदलाला चक्र 3 पानबुडी सोपविणार आहे.
40 वर्षांनी INS संध्याक निवृत्त
भारतीय नौदलाकडे असलेली सर्वात जुनी हाइड्रोग्राफिक सर्वे शीप आयएनएस संध्याक शुक्रवारी निवृत्त झाली. हे जहाज 40 वर्षांपासून देशाची सेवा करत होते. या जहाजाने ऑपरेशन पवन (1987 मध्ये श्रीलंकेची मदत करणे) आणि ऑपरेशन रेनबो (2004 मध्ये सुनामीमध्ये मदत) मध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. हे जहाज 26 फेब्रुवारीला 1981 मध्ये सेवेत आले होते.