भारतीय नौदलाचा समुद्रात पराक्रम, चाच्यांपासून केली 23 पाकिस्तानी नागरिकांची सुटका! 12 तास चाललं ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 09:53 AM2024-03-30T09:53:33+5:302024-03-30T09:54:14+5:30
नौदलाने म्हटले आहे की, ‘‘आयएनएस सुमेधाने शुक्रवारी पहाटे FV 'अल कंबर'ला रोखले आणि नंतर आयएनएस त्रिशूलही या मोहिमेत सहभागी झाले.’’ घटनेवेळी मासे मारी करणारे जहाज सोकोट्रापासून जवळपास 90 समुद्राती मैल (एनएम) नैऋत्येला होते. यावर सशस्त्र चाचे होते."
भारतीय नौदलाने समुद्रात पुन्ह एकदा आपला पराक्रम दाखवला आहे. भारतीय नौदलाने शुक्रवारी अरबी समुद्रात हायजॅक करण्यात आलेले मासे पकडणारे इराणी जहाज अल-कंबर 786 आणि त्यावरील 23 पाकिस्तानी चालकांची सुखरूप सुटका केली. जवळपास 12 तास ही कारवाई सुरू होती. यानंतर चाच्यांना आत्मसमर्पण करणे भाग पडले. यासंदर्भात माहिती देताना संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय नौदलाने चाच्यांविरुद्ध 12 तासांहूनही अधिक वेळ चाललेल्या कारवाईत, त्यांनी हायजॅक केलेले मसेमारी करणारे इराणचे जहाज आणि त्यावरील 23 पाकिस्तानी नागरिकांची सुखरूप सुटका केली."
नौदलाच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, पुन्हा एकदा सुरक्षितपणे मासेमारी करता यावी, यासाठी भारतीय नौदलाच्या तज्ज्ञांचा चमू संबंधित जहाजाची तपासणी करत आहे. यासंदर्भात, आम्ही अपहरण केलेल्या मासेमारी करणाऱ्या जहाजाची सुटका करण्याच्या मोहिमेत आहोत. या जहाजावर नऊ सशस्त्र समुद्री चाचे आणि त्यांचे चालक आहेत, असे भारतीय नौदलाने शुक्रवारी रात्री उशिरा सांगितले होते.
नौदलाने म्हटले आहे की, ‘‘आयएनएस सुमेधाने शुक्रवारी पहाटे FV 'अल कंबर'ला रोखले आणि नंतर आयएनएस त्रिशूलही या मोहिमेत सहभागी झाले.’’ घटनेवेळी मासे मारी करणारे जहाज सोकोट्रापासून जवळपास 90 समुद्राती मैल (एनएम) नैऋत्येला होते. यावर सशस्त्र चाचे होते."
भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी गेल्या शनिवारी म्हटले होते की, "हिंदी महासागर अधिक सुरक्षित बनविण्यासाठी नौदल 'सकारात्मक कारवाई' करेल. नौदलाने गेल्या 100 दिवसांत चाच्यांविरोधात केलेल्या कारवाईचा उल्लेखही त्यांनी केला होता. तेसेच सोमालियाच्या किनारपट्टीवर नुकत्याच केलेल्या कारवाईत पकडण्यात आलेल्या 35 चाच्यांना घेऊन युद्धनौका INS कोलकाता शनिवारी सकाळी मुंबईत पोहोचली आहे.