अरे व्वा! आता फक्त एक मिस्ड कॉल देऊन बुक करता येणार LPG सिलिंडर, "या" कंपनीने सुरू केली सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 01:58 PM2021-01-02T13:58:55+5:302021-01-02T14:03:18+5:30

LPG Cylinder : संपूर्ण देशभरात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.  

indian oil launches missed call service on new year | अरे व्वा! आता फक्त एक मिस्ड कॉल देऊन बुक करता येणार LPG सिलिंडर, "या" कंपनीने सुरू केली सुविधा

अरे व्वा! आता फक्त एक मिस्ड कॉल देऊन बुक करता येणार LPG सिलिंडर, "या" कंपनीने सुरू केली सुविधा

Next

नवी दिल्ली - दर महिना अथवा दी़ड महिन्याने गॅस सिलिंडर (Gas Cylinder booking) हा बुक केला जातो. घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना आता आणखी एक सोपा पर्याय उपलब्ध होणार आहे. आता फक्त एक मिस्ड कॉल देऊन LPG सिलिंडर बुक करता येणार आहे. देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईलकडून यावर्षी आपल्या LPG गॅसधारकांसाठी ही नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना एक मिस्ड कॉल देऊन सिलेंडर बुक करता येणार आहे. 

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशभरात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.  ग्राहकांना गॅस बुक करण्यासाठी 8454955555 या क्रमांकावर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून मिस्ड कॉल द्यावा लागेल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. सध्याच्या आईवीआरएस (इंटरॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम) कॉल प्रणालीत कॉलसाठी सामान्य दर आकारले जातात. मात्र, आता नव्या सुविधेमुळे ज्येष्ठ व्यक्ती आणि आईवीआरएस प्रणालीचा वापर करण्यात अडचणी जाणवणाऱ्या लोकांची सोय होणार आहे.

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून भुवनेश्वर येथील एका कार्यक्रमात मिस्ड कॉल सुविधेचे उद्घाटन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रीमियम ग्रेड पेट्रोल (ऑक्टेन 100) हे उत्पादनही सादर केले. इंडियन ऑईलकडून एक्सपी- 100 ब्रँडअंतर्गत या पेट्रोलची विक्री केली जाईल. 2014 पर्यंत देशभरात फक्त 13 कोटी गॅस कनेक्शन्स होती. मात्र, गेल्या सहा वर्षांमध्ये हा आकडा 30 कोटीपर्यंत पोहोचल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

मिस्ड कॉल देऊन असा घ्या सुविधेचा लाभ

- मिस कॉल सुविधेसाठी फक्त एक गोष्ट करावी लागणार आहे. 

- रिफिल बुकिंगसाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 8454955555 वर मिस कॉल द्यावा लागेल. 

- त्यानंतर तुम्हाला सिलिंडर बुक झाल्याचा मेसेज येईल. 

आता Amazon वरून बुक करता येणार गॅस सिलिंडर, जाणून घ्या नेमकं कसं?

घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना आता आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. अ‍ॅमेझॉनवरून ग्राहक नेहमीच वेगवेगळ्या वस्तू ऑर्डर करत असतात. मात्र आता ग्राहकांना अ‍ॅमेझॉनवर सिलिंडर बुक करता येणार आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाने हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडशी करार केला आहे. त्यानुसार आता HP कंपनीचा सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना अ‍ॅमेझॉनवरुन पैसे भरुन सिलिंडर घेता येणार आहे. ग्राहकांना त्यामुळे IVRच्या माध्यमातून सिलिंडर बुक करण्याची आवश्यकता नाही. सिलिंडर बुक करायचा असल्यास थेट अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. अ‍ॅमेझॉन पे टॅबवर जाऊन बुकिंग करावं लागेल. त्यानंतर कोणत्याही डिजिटल मोडचा वापर करून पैसे देता येतील. आम्ही डिजिटल पेमेंटमध्ये सातत्याने नवनवीन अनुभव आणण्याचा प्रयत्न करत आहोत अशी माहिती अ‍ॅमेझॉन पे चे सीईओ महेंद्र नेरुरकर यांनी दिली आहे.

Web Title: indian oil launches missed call service on new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.