इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून इंडियन ऑईलच्या अधिका-याला अटक

By admin | Published: December 11, 2015 02:00 AM2015-12-11T02:00:41+5:302015-12-11T09:05:18+5:30

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून इंडियन आॅईल कॉर्पोरेनशच्या (आयओसी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

Indian Oil officer arrested on charges of having a connection with this | इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून इंडियन ऑईलच्या अधिका-याला अटक

इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून इंडियन ऑईलच्या अधिका-याला अटक

Next

जयपूर : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून इंडियन आॅईल कॉर्पोरेनशच्या (आयओसी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
विशेष कृती गट (एसओएस) अािण राजस्थानच्या एटीएस पथकाने मोहम्मद सिराजुद्दीनला अटक केली. आयओसीत विपणन व्यवस्थापक असलेला सिराजुद्दीन कर्नाटकातील गुलबर्गचा आहे. या दहशतवादी संघटनेच्या कारवायातील सहभाग, माहिती पुरविणे आणि या संघटनेत भरती होण्यासाठी युवकांना प्रेरित करणे या आरोपाखाली बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याखाली त्याला अटक करण्यात आली आहे, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एटीएस आणि एसओजी) आलोक त्रिपाठी यांनी सांगितले.
मिळालेल्या तक्रारीनुसार या संयुक्त पथकाने त्याच्या संशयित हालचालींबाबत शहानिशा केली, तसेच त्याचे व्हॉटस् अ‍ॅप आणि फेसबुक अकाऊंटही तपासले. जयपूरमधील त्याच्या घरातून आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले असून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांशी संपर्क करायचा. विशेष म्हणजे या दहशतवादी संघटनेच्या ‘दबिक’ या आॅनलाईन मासिकाचे अनेक अंक, चित्रे आणि व्हिडिओही त्याच्याकडून जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Indian Oil officer arrested on charges of having a connection with this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.