भारतात ओमायक्रॉनची डबल सेंचुरी, महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 02:15 PM2021-12-21T14:15:55+5:302021-12-21T14:18:02+5:30

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनची 200 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत.

Indian omicron News, India has a total of 200 cases of omicron variant, highest number of cases in maharashtra and delhi | भारतात ओमायक्रॉनची डबल सेंचुरी, महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण

भारतात ओमायक्रॉनची डबल सेंचुरी, महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण

Next

नवी दिल्ली: संपूर्ण जगाची चिंता वाढवणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतातही या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवार सकाळपर्यंत देशात ओमिायक्रॉनची 200 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत.

दिल्ली-महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये ओमायक्रॉनची 54 प्रकरणे नोंदवण्यात आली असून त्यापैकी 12 रुग्ण बरे झाले आहेत आणि 42 रुग्ण रुग्णालय आणि आयसोलेशनमध्ये आहेत. तर, महाराष्ट्रातही 54 रुग्णांची नोंद झाली आहे, परंतु येथे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिल्लीपेक्षा जास्त आहे. राज्यात आतापर्यंत 28 रुग्ण बरे झाले आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्र व्यतिरिक्त, तेलंगणामध्ये 20 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यानंतर कर्नाटकात 19, राजस्थानमध्ये 18 रुग्ण आहेत.

कोणत्या राज्यात किती रुग्ण ?

  1. महाराष्ट्र- 54
  2. दिल्ली- 54
  3. तेलंगाना- 20
  4. कर्नाटक- 19
  5. राजस्थान- 18
  6. केरळ- 15
  7. गुजरात- 14
  8. उत्तर प्रदेश- 2
  9. आंध्र प्रदेश- 1
  10. चंडीगड- 1
  11. तामिलनाडू- 1

12.पश्चिम बंगाल- 1

ठीक होणाऱ्यांची संख्याही जास्त
दिलासादायक बाब म्हणजे, ओमायक्रॉनच्या 200 रुग्णांपैकी 77 रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत. मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणूची 5,326 नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. हा आकडा मागील 581 दिवसांतील सर्वात कमी आहे. सध्या भारतात 79,097 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

कोरोना रुग्णात घट
सकाळी 8 वाजता जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, एकूण मृतांची संख्या 4,78,007 वर पोहोचली आहे. गेल्या 54 दिवसांपासून कोरोना विषाणूची रोजची नवीन प्रकरणे 15,000 पेक्षा कमी आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 79,097 वर आली आहे, जी संसर्गाच्या एकूण प्रकरणांच्या 0.23 टक्के आहे. हा दर मार्च 2020 नंतरचा सर्वात कमी आहे. गेल्या 24 तासांत कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 3,170 ने घट झाली आहे.

Web Title: Indian omicron News, India has a total of 200 cases of omicron variant, highest number of cases in maharashtra and delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.