भारतीय पासपोर्टची पॉवर वाढली, 'या' 124 देशांमध्ये अगदी सहज प्रवास करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 07:48 PM2024-12-10T19:48:49+5:302024-12-10T19:52:19+5:30

Indian Passport : भारतीय पासपोर्टची पॉवर वाढली, या 124 देशांमध्ये करता येणार प्रवास

Indian Passport: The power of Indian passport has increased, travel can be done easily in these 124 countries | भारतीय पासपोर्टची पॉवर वाढली, 'या' 124 देशांमध्ये अगदी सहज प्रवास करता येणार

भारतीय पासपोर्टची पॉवर वाढली, 'या' 124 देशांमध्ये अगदी सहज प्रवास करता येणार

Indian Passport : भारतातील सर्व पासपोर्टधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. भारतीयपासपोर्टची पॉवर आणखी वाढली आहे. पासपोर्ट असेल, तर तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय जगभरातील 124 देशांमध्ये प्रवास करू शकता. म्हणजेच, या देशांमध्ये जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा मिळविण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार नाहीत. ई-व्हिसा, व्हिसा फ्री आणि व्हिसा ऑन अरायव्हलद्वारे तुम्हाला त्या देशाचा व्हिसा काही मिनिटांत सहज मिळेल.

व्हिसाची प्रक्रिया सोपी असल्यावर व्हिसासाठी फार फेऱ्या मारण्याची गरज नसते. ज्या देशांमध्ये अरायव्हल व्हिसाची सुविधा आहे, तिथे गेल्यावर व्हिसा सहज मिळू शकतो. इतकंच नाही, तर व्हिसामुक्त देशांमध्ये प्रवास करताना व्हिसा शुल्काची बचतही होते.

या 58 देशांमध्ये ई-व्हिसा सुविधा सुरू झाली
अल्बेनिया, अंगोला, अँटिग्वा आणि बारबुडा, अर्जेंटिना, अर्मेनिया, ऑस्ट्रेलिया, अझरबैजान, बहरीन, बेनिन, बोत्सवाना, बुर्किना, फासो, कॅमेरून, चिली, कोट डी'आयव्होरी, जिबूती, इजिप्त, इथिओपिया, गॅबॉन, जॉर्जिया, गिनी हाँगकाँग, इंडोनेशिया, जपान, जॉर्डन, कझाकस्तान, केनिया, किर्गिझस्तान, लाओस, मलावी, मलेशिया, मोल्दोव्हा, मंगोलिया, मोरोक्को, मोझांबिक, म्यानमार, नामिबिया, न्यूझीलंड, ओमान, फिलीपिन्स, रिपब्लिक ऑफ गिनी , रशिया, साओ टोम आणि प्रिंसिपे, सिंगापूर, दक्षिण सुदान, श्रीलंका, सुरीनाम, सीरिया, तैवान, ताजिकिस्तान, टांझानिया, टोगो, त्रिनिदाद आणि टोबॅगो, तुर्की, यूएई, युगांडा, उझबेकिस्तान, व्हिएतनाम आणि झांबिया.

या 26 देशांनी व्हिसा फ्री सेवा सुरू केली
थायलंड, भूतान, नेपाळ, मॉरिशस, मलेशिया, केनिया, इराण, अंगोला, बार्बाडोस, डोमिनिका, एल साल्वाडोर, फिजी, गांबिया, ग्रेनाडा, हैती, जमैका, कझाकिस्तान, किरिबाटी, मकाऊ, मायक्रोनेशिया, पॅलेस्टिनी प्रदेश, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेनेगल , सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो, सेशेल्स आणि सर्बिया.

या 40 देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा
कतार, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी), सेंट डेनिस (रियुनियन बेट), सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, सौदी अरेबिया, सिएरा लिओन, दक्षिण सुदान, श्रीलंका, सेंट किट्स आणि नेव्हिस, टांझानिया, थायलंड, झिम्बाब्वे, अंगोला, अँटिग्वा आणि बार्बुडा, बहरीन, बार्बाडोस, बुरुंडी, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, कोबे, वर्दे, जिबूती, इजिप्त, इरिट्रिया, फिजी, गॅबॉन, घाना, गिनी, बिसाऊ, हैती, इंडोनेशिया, इराण, जमैका, जॉर्डन, लाओस, मादागास्कर, मॉरिटानिया, मॉरिशस, मंगोलिया, म्यानमार, नायजेरिया आणि ओमान.

Web Title: Indian Passport: The power of Indian passport has increased, travel can be done easily in these 124 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.