अमेरिकन सिनेटमध्ये भारतीय पंतप्रधान

By admin | Published: June 9, 2016 06:10 PM2016-06-09T18:10:57+5:302016-06-09T18:10:57+5:30

मोंदीच्या आधी पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहनसिंग यांनी सिनेटमध्ये भाषणे दिली होती. त्यांच्या भाषणांचा थोडक्यात आढावा घेऊया .

Indian Prime Minister in the American Senate | अमेरिकन सिनेटमध्ये भारतीय पंतप्रधान

अमेरिकन सिनेटमध्ये भारतीय पंतप्रधान

Next
 
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सिनेटमध्ये जोरदार भाषण केले, त्यांनी पहिली काही मिनीटे भारत आणि भारतीय संस्कृति याविषयी बोलण्यात खर्ची घातली. मात्र, त्यानंतर सुमारे पाऊण तासांच्या भाषणात त्यांनी उभय देशातील संबंधांपासून दहशतवाद, भारताची प्रगती यासह अनेक मुद्यांना स्पर्श केला. भारत आणि अमेरिकेच्या संबंधांची वीण उलगडून दाखविताना त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो शहरातील भाषणाचा उल्लेख केला.
 
थोर अमेरिकन नेते मार्टीन ल्युथर किंग यांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या शिकवणीपासून प्रेरणा घेतली होती. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अमेरिकी राज्यघटनेचा प्रभाव होता, असे त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या संसदेत संयुक्त बैठकीत भाषण करणारे नरेंद्र मोदी भारताचे सहावे पंतप्रधान ठरले. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहनसिंग या पंतप्रधानांना हा सन्मान मिळाला होता. भारतीय पंतप्रधानांनी सिनेटमध्ये जाऊन केलेल्या भाषणांचा थोडक्यात आढावा घेऊया . 
 
 
पंडित जवाहरलाल नेहरू : भारत स्वातंत्र झाल्यांनतर १३ अक्टूबर १९४९ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदाच अमेरिकन सिनेटमध्ये भाषण केले होते. अमेरिकेन सिनेटमध्ये भाषण करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधानाचा मान मिळाला होता. आपल्या भाषणात त्यांनी अमेरिका आणि भारताच्या व्यवसायिक संबधावर जोर दिला होता. 
मी अमेरिकेमध्ये दिल आणि दिमग शोधण्यासाठी आलो आहे. माझ्या मते दोन्ही देश एकमेंकाशी चांगले संबध प्रस्थापित करु पाहत आहेत. ऐखादा देश अथवा माणसास यशस्वी व्हायचे असेल तर त्याच्या आत्मनिर्भरता आणि मेहनतीवर ते अवलंबुन असते. भारतात आर्थिक शमता आहे त्याच्या जोडीला मेहनती नागरीकही आहेत पण याला टेकनिकल आणि मशिनची जोड हवी आहे. ती मदत तुमच्याकडून मिळेल ही आपेक्षा आहे. आशा पद्धतीच्या मिळणाऱ्या मदतीचे आम्ही स्वगत करु. यामधून दोन्ही देशांचा फायदा होऊ शकतो. 
 
दरम्यान, हाऊस चैंबरची डागडुजी सुरु असल्यामुळे पंडित नेहरु यांनी अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळे भाषण केले होते.
 
 
राजीव गांधी : ४१ वर्षीय राजीव गांधी यांनी अमेरिका कांग्रेसमध्ये ज्यावेळी भाषण केले त्यावेळी त्यांच्या आवाजात अधुनीक भारताचे स्वप्न होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तब्बत ३५ वर्षानंतर राजीव गांधी यांनी सिनेटमध्ये जाऊन संबोधित केले. १३ जून १९८५ रोजी त्यांनी आपल्या भाषणानी सिनेट गाजवली होती. भारत देश प्रचिन विचारांचा असला तरी भारतात तरुणवर्ग मोठ्याप्रमाणात आहे. भारत हा तरुणांचा देश आणि मी सुद्धा तरुण आहे. ज्याप्रमाणे जगात तरुण उत्साही आहेत त्याचप्रमाणे आम्ही ही उत्साही आहोत. माझे एक स्वप्न आहे. सदृढ, आत्मनिर्भर आणि स्वतंत्र भारताचे स्वप्न आहे. मानवता आणि विकासामध्ये विकसित देशासोबत आम्ही काम करु एकत्रित असू. 
 

पी व्ही नरसिंह राव : १८ मे १९९४ रोजी नरसिंह राव यांनी अमेरिकन सिनेटमध्ये भाषण केले, इतिहासात भारत आणि अमेरिकाने एकमेकांकडून खुप काही शिकले आहे. विचारांचे आदान प्रदान करताना दोन्ही देशातील अंतराचा आपल्यावर कोणताच परिणाम पडत नाही कारण याचे माध्यम हे आपल्या मस्तिष्क(मेंदू)पासून आहे. पुढील दशकापर्यंत भारत जागतिक शांती आणि समृद्धीसाठी तयार असेल. आणि यासाठी आम्ही अमेरिका आणि अमेरिकन नागरीकींच्या सोबतच असू. १९९१ - ९६ दरम्यान त्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले. नरसिंहराव यांच्यानंतर भारतातील आर्थिकेचा स्थर सुधारला गेला.भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचा नवा अध्यायासही सुरुवात झाली. 
 
अटल बिहारी वाजपेयी : १४ सप्टेंबर २००० रोजी भारतीय पंतप्रधान वाजपेयी यांनी अमेरिकन सिनेटमध्ये आपले भाषण दिले. त्यावेळी त्यांनी भारताबरोबरच आशिया खंडातील शांततेविशयक मुद्यावर जोर दिला. ते म्हणाले. जर आपण लोकशाही समृद्ध, सहनशील, बहुलवादी आणि स्थिर आशिया पाहिजे असेल जिथे आपण सर्वजनांना सुरक्षित वाटावे असे वाटत असेल तर आपल्याला जुन्या विचारांना नव्या ढंगात पद्धित वापर केला पाहिजे. ऐणाऱ्या कालखंडात लोकशाही आणि आणिक स्थरने भारताशिवाय आशियाचा विचारदेखिल करता येणार नाही. वाजपेयी अमेरिकेत जाण्यापुर्वी भारताकडे अण्वस्त्र उपलब्ध झाले होते. 

डॉ मनमोहन सिंह :  जुलै २००५ रोजी मनमोहन सिंह यांनी अमेरिकन सिनेटमध्ये भारताचा डंका बजावला होता. २००० नंतर भारतासह अमेरिकाही त्यावेळी दहशतवादाच्या गंभीर समस्सेला सामोर जात होता. त्यावेळी मनमोहन यांनी याच मुद्दयावर सिनेमध्ये जोरदार भाष्य केलं होत. त्यावेळी ते म्हणाले होते, भारत आणि अमेरिकेला मिळून दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करायला पाहिजे, दहशतवाद मुळापासून संपण्यासाठी एकत्रत लढ्याची गरज आहे. दहशतवादास आपण वेगवेगळ्या दृष्टीकोनातून न पाहता त्यांच्या सरवांचा पाहण्याचा दृष्टीकोन एकच हवा. दहशतवादाच मुळे जिथे असेल तिथून त्याचा नायनाट करायला हवा. दहशतवातामुळे लोकशाहीला धोका होऊ शकतो, अमेरिकेमध्ये झालेल्या ९/११च्या दहशतवादी हल्ल्यामुळे मनमोन सिंह यांचे भाषण अधिक प्रभावी झाले होते.  
 

 

Web Title: Indian Prime Minister in the American Senate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.