100 नवीन वंदे भारत एक्सप्रेससह 772 ट्रेन्स जोडल्या; रेल्वेमंत्र्यांनी मांडली 5 वर्षांची रिपोर्ट...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 09:22 PM2024-08-05T21:22:42+5:302024-08-05T21:23:14+5:30
Indian Railway new Train: रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी संसदेत याबाबत माहिती दिली.
Indian Railway : मागील काही वर्षांपासून रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. अशातच, भारतीय रेल्वेने गेल्या पाच वर्षांत 772 अतिरिक्त गाड्या रेल्वे नेटवर्कमध्ये जोडल्या आहेत. यामध्ये 100 वंदे भारत एक्सप्रेसचाही समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी आज संसदेत ही माहिती दिली.
या गाड्या जोडल्या गेल्या
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, सर्व विभागातील प्रवाशांच्या गरजा समजून रेल्वेने एक्स्प्रेस ट्रेन, सुपरफास्ट ट्रेन, पॅसेंजर/MEMU/DMMU अशा विविध श्रेणींमध्ये गाड्या सुरू केल्या आहेत. भारतीय रेल्वेमध्ये नवीन रेल्वे सुविधा आणण्याचे कामही वेगाने सुरू आहे.
आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात वैष्णव म्हणाले, रेल्वेतील सर्व गाड्यांच्या प्रतीक्षा यादीतील स्थितीचे वेळोवेळी निरीक्षण केले जाते. अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी विद्यमान गाड्यांच्या लोड फॅक्टरमध्ये वाढ करण्यात आली आहे. यासोबतच नवीन गाड्या सुरू करून विशेष गाड्या चालवल्या जातात आणि सध्याच्या गाड्यांची वारंवारता वाढवली जात आहे.
रेल्वेची 'विकल्प' योजना काय आहे?
रेल्वेकडून 'रेल्वे विकास प्रणाली' चालवली जात आहे. या अंतर्गत एखाद्या विशिष्ट मार्गासाठी तिकीट बुक केल्यावर प्रवाशांना त्या मार्गावरील इतर कोणत्याही रिकाम्या ट्रेनमध्ये जागा दिली जाते. या योजनेंतर्गत, एखाद्या प्रवाशाने लोअर क्लास तिकीट काढले आणि त्या मार्गावरील इतर कोणत्याही ट्रेनमध्ये अप्पर क्लासमध्ये जागा रिकामी असेल, तर त्याची सीटही अपग्रेड केली जाते.