Indian Railway: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! IRCTCने तिकीट बुकिंगच्या नियमामध्ये केला मोठा बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 03:43 PM2022-06-06T15:43:51+5:302022-06-06T15:44:15+5:30
Indian Railway, IRCTC News: जर तुम्ही रेल्वेमधून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आयआरसीटीसीने ट्रेन तिकिटाच्या बुकिंगच्या नियमामध्ये मोठा बदल केला आहे. या बदलामुळे आयआरसीटीसीच्या अकाऊंटवरून तिकीट बुक करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
नवी दिल्ली - जर तुम्ही रेल्वेमधून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आयआरसीटीसीने ट्रेन तिकिटाच्या बुकिंगच्या नियमामध्ये मोठा बदल केला आहे. या बदलामुळे आयआरसीटीसीच्या अकाऊंटवरून तिकीट बुक करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या नव्या नियमानुसार तु्म्हाला एका महिन्यामध्ये आधीपेक्षा अधिक तिकिटे बुक करता येणार आहेत.
आयआरसीटीसीने एक नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार जर तुम्ही तुमचे आधारकार्ड आयआरसीटीचीशी लिंक केलेलं असेल तर तुम्हाला याचा फायदा मिळेल.
जर तुम्ही आधी आयआरसीटीच्या अकाऊंटवरून महिन्याला कमाल ६ तिकिटे बूक करू शकत होता. मात्र जर तुम्ही आधार कार्डसोबत आयआरसीटीचा आयडी लिंक केलेला असेल तर तुम्ही आता एका महिन्यामध्ये कमाल १२ तिकिटे बुक करू शकत होता. मात्र आयआरसीटीसीने या नियमामध्ये मोठा बदल केला आहे. आता तुम्ही एका आयडीवरून महिन्याला २४ तिकिटे बुक करू शकाल.
रेल्वेची तिकीट बुक करण्यासाठी एका पॅसेंजरचं प्रोफाईल आधाराकार्डशी व्हेरिफाईड असलं पाहिजे. मास्टर लिस्टमध्ये माय प्रोफाईल नावाची एक टॅब असते. तिकीट बुकिंगपूर्वी येथे पॅसेंजरचं नाव आणि आधारकार्डची डिटेल देऊन मास्टर लिस्ट अपडेट करा.