विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वेला बंपर कमाई, तब्बल २१४ कोटींची रेकॉर्ड ब्रेक दंड वसुली!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 07:59 PM2022-04-03T19:59:40+5:302022-04-03T20:00:11+5:30
Indian Railway News: 2021-22 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांकडून विक्रमी वसुली केली आहे. अशा प्रवाशांकडून मध्य रेल्वेने २१४ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.
Indian Railway News: 2021-22 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांकडून विक्रमी वसुली केली आहे. अशा प्रवाशांकडून मध्य रेल्वेने २१४ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील तिकीट तपासणीतून वसुलीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. एकूणच विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेला बंपर कमाई झाली आहे.
मुंबईतील प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी लोकल ट्रेनवर सर्वाधिक अवलंबून असतात. म्हणूनच या लोकल गाड्यांना मुंबईची लाईफ लाईन असंही म्हणतात. दररोज लाखो लोक लोकल ट्रेनमधून प्रवास करतात आणि इच्छित स्थळी पोहोचतात. कोरोनाच्या काळात लोकल ट्रेनच्या वेगाला ब्रेक नक्कीच लागला होता. मात्र यादरम्यान लोकल ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती. यादरम्यान, लोकलमध्ये एक चेकिंग टीम असायची आणि ते प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला तिकिटाबद्दल विचारलं जायचं. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेचे टीटी दंड वसूल करत असत.
मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकानं ३५.३६ लाख लोकांवर कारवाई करून २०२१-२२ या वर्षात २१४.१४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्याचं हेच मुख्य कारण आहे. हा आकडा भारतीय रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे, जो मध्य रेल्वेकडून तिकीट तपासणीदरम्यान दंडाच्या स्वरूपात जमा करण्यात आला आहे.