Indian Railway: दर तीन दिवसांत एका कर्मचाऱ्याला नारळ, रेल्वेची कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 11:14 AM2022-11-25T11:14:06+5:302022-11-25T11:15:25+5:30
Indian Railway: गेल्या १६ महिन्यांत रेल्वेच्या सेवेतून १७७ कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. जुलै २०२१पासून दर तीन दिवसांत एक भ्रष्ट अधिकारी किंवा कामचुकार कर्मचाऱ्याला सेवेतून काढण्यात आले आहे.
नवी दिल्ली : गेल्या १६ महिन्यांत रेल्वेच्या सेवेतून १७७ कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. जुलै २०२१पासून दर तीन दिवसांत एक भ्रष्ट अधिकारी किंवा कामचुकार कर्मचाऱ्याला सेवेतून काढण्यात आले आहे. आतापर्यंत १३९ अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगण्यात आले, तर ३८ जणांची सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
आणखी कठोर कारवाई हाेणार
रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, जुलै २०२१ पासून ज्यांच्यावर कारवाई झाली त्यामध्ये इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग, स्टोअर, मॅकेनिकल आदी विभागांतील रेल्वे कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या आहे. कठोर कारवाईचे हे सत्र यापुढील काळातही सुरू राहाणार आहे, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.