प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! रेल्वेत अचानक तब्येत बिघडल्यास बोलवा डॉक्टर; कसं ते जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 03:22 PM2021-08-19T15:22:31+5:302021-08-19T15:23:43+5:30
रेल्वेकडून डॉक्टरचीही सुविधा दिली जाते. प्रवासावेळी तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता.
जेव्हा कधीही तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तेव्हा तुम्हाला रेल्वे प्रवासातील विविध नियमांची माहिती असायला हवी. समजा, प्रवासादरम्यान इमरजेन्सी असेल तर तुम्ही कशारितीने ती परिस्थिती हाताळू शकाल, तुम्ही एखाद्या ट्रेनमधून प्रवास करत आहात आणि प्रवासावेळी तब्येत खराब झाली तर तुम्हाला काय करायला हवं? प्रवासावेळी तुम्हाला आलेल्या समस्येवर उपाय शोधला जाऊ शकतो. ते कसं ते जाणून घेऊया..
रेल्वेकडून डॉक्टरचीही सुविधा दिली जाते. प्रवासावेळी तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. प्रवासावेळी तब्येत बिघडली तर तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता. परंतु तुम्हाला माहित्येय, इमरजेन्सी परिस्थितीत डॉक्टरांना कसं बोलवायचं? जर नसेल तर तुम्ही ही माहिती जाणून घ्या. तब्येत खराब झाल्यानंतर काय करायलं हवं जेणेकरुन रेल्वे प्रवासावेळी तुम्हाला जास्त अडचण येऊ नये.
डॉक्टरांना कसं बोलवायचं?
रेल्वेत आपत्कालीन स्थितीत डॉक्टरांची मदत घेऊ शकता. जर प्रवासावेळी कुणाची तब्येत बिघडली तर तुम्हाला टीसीची संपर्क साधावा लागेल. तो इमरजेन्सी स्थितीनुसार व्यवस्था करू शकतो. प्रत्येक स्टेशनवर डॉक्टरांची व्यवस्था नसते. त्यामुळे टीसी पुढील मोठ्या स्टेशनवर डॉक्टरांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे येणाऱ्या स्टेशनवर रुग्णाला डॉक्टरांची सुविधा मिळू शकते आणि तब्येत जास्त खराब असल्यास तेथूनच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जाऊ शकते.
कधीही तुम्हाला प्रवासावेळी डॉक्टरांची गरज भासली तर रेल्वेच्या कुठल्याही स्टाफशी संपर्क करा. जर तुम्हाला फर्स्ट एड बॉक्सची गरज असेल तर टीसी त्याची व्यवस्था तात्काळ करू शकतो. ट्रेनमध्ये फर्स्ट एड बॉक्स असतो. त्याचा उपयोग करुन शरीरावर कुठेही जखम अथवा रक्त येत असेल तर करु शकता. त्याशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करणारे किती डॉक्टर आहेत त्याची माहिती टीसीकडे असते. तसेच ज्या ट्रेनमध्ये अनाउंसमेंटची व्यवस्था असते तिथे उद्घोषणा केली जाते. जर कोणी प्रवासी डॉक्टर असेल तर रुग्णाची तातडीने मदत होते.
हे नियम लक्षात ठेवा
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, ट्रेनच्या छतावर बसून प्रवास करणे गुन्हा आहे. तसेच ट्रेनची सीडी, दरवाजे, इंजिन येथे बसून प्रवास करण्यावर बंदी आहे. रेल्वे कलम १५६ नुसार ट्रेनच्या छतावरुन, सीडी, दरवाजा इथे बसून प्रवास केल्यास ३ महिन्यांची जेल होऊ शकते. रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटप्रमाणे जर हे गुन्हे केल्यास त्यांना ५०० रुपयांपेक्षा अधिक दंडाची रक्कम भरावी लागते. त्याचसोबत तुम्ही ज्या वर्गाची तिकीट घेतली असेल आणि अन्य क्लासमधून प्रवास करत असाल तर तोदेखील गुन्हा आहे.