Indian Railway: रेल्वेगाड्यांत आस्वाद घ्या आवडीच्या खाद्यपदार्थांचा, रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 10:19 AM2022-11-18T10:19:39+5:302022-11-18T10:22:23+5:30

Indian Railway: रेल्वेने प्रवास करताना यापूर्वी आयआरसीटीसीतर्फे पुरविण्यात येणाऱ्या भोजनात मोजक्या पदार्थांचा समावेश करण्यात येत होता; परंतु विविध राज्यांतील प्रवाशांना आवडत असलेले खाद्यपदार्थ त्यांना रेल्वे प्रवासात मिळावेत यासाठी रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Indian Railway: Enjoy your favorite food in the trains, a big decision of the Ministry of Railways | Indian Railway: रेल्वेगाड्यांत आस्वाद घ्या आवडीच्या खाद्यपदार्थांचा, रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय

Indian Railway: रेल्वेगाड्यांत आस्वाद घ्या आवडीच्या खाद्यपदार्थांचा, रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय

Next

नागपूर : रेल्वेने प्रवास करताना यापूर्वी आयआरसीटीसीतर्फे पुरविण्यात येणाऱ्या भोजनात मोजक्या पदार्थांचा समावेश करण्यात येत होता; परंतु विविध राज्यांतील प्रवाशांना आवडत असलेले खाद्यपदार्थ त्यांना रेल्वे प्रवासात मिळावेत यासाठी रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना त्यांच्या प्रादेशिक गरजेनुसार खाद्यपदार्थ पुरविण्याची मंजुरी आयआरसीटीसीला (भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ) देण्यात आली आहे.
रेल्वेगाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या खान-पान सेवेत सुधारणा करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसीला अन्नपदार्थांच्या यादीतील पदार्थ ठरविण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार प्रादेशिक पातळीवरील वैशिष्ट्य असलेले खाद्यपदार्थ, विविध ऋतूंत बनविल्या जाणाऱ्या पाककृती, सणासुदीच्या काळात मागणी असलेले पदार्थ, मधुमेहाच्या प्रवाशांना लागणारे भोजन, लहान मुलांना आवश्यक खाद्यपदार्थ, भरडधान्यावर आधारित स्थानिक खाद्यपदार्थ, आरोग्यदायी खाद्यपदार्थ आदींचा समावेश प्रवाशांच्या जेवणात व्हावा या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. 

Web Title: Indian Railway: Enjoy your favorite food in the trains, a big decision of the Ministry of Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.