Indian Railway: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कुठल्याही शुल्काची गरज नाही, असा करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 03:45 PM2023-04-30T15:45:12+5:302023-04-30T16:03:49+5:30
Indian Railway: उत्तर पश्चिम रेल्वेअंतर्गत असिस्टंट लोको पायलट पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ७ एप्रिलपासून सुरू आहे. तसेच ६ मेपर्यंत अर्ज सादर करता येतील.
उत्तर पश्चिम रेल्वेअंतर्गत असिस्टंट लोको पायलट पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ७ एप्रिलपासून सुरू आहे. तसेच ६ मेपर्यंत अर्ज सादर करता येतील. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ rrcjaipur.in वर जाऊन आपला अर्ज दाखल करावा.
रेल्वेच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये या भरती प्रक्रियेंतर्गत असिस्टंट लोकोपायलटच्या २३८ पदांवर नियुक्ती करण्यात येईल. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांजवळ कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डाचे दहावी उत्तीर्ण असल्यासोबतचे फिटर इलेक्ट्रिशियन, मॅकॅनिकमध्ये आयटीआय केल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तसेच मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात.
या पदांवर अर्ज करण्यासाठी सामान्य वर्गातील उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ही ४२ वर्षे, ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्षे आणि एससी एसटी वर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही ४७ वर्षे एवढी निर्धारित करण्यात आली आहे.
या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना कुठलंही शुल्क भरावं लागणार नाही. रेल्वेमध्ये असिस्टंट कोलो पायलट पदावर उमेदवारांची निवड ही संगणकावर आधारित चाचणी, लेखी परीक्षेच्या आधारावर होईल. त्यानंतर अॅप्टीट्युड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट आयोजित केली जाईल.