Indian Railway: रेल्वे प्रवासामध्ये किती दारू सोबत ठेवू शकतो? काय आहे रेल्वेचा नियम, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 03:49 PM2023-05-10T15:49:12+5:302023-05-10T15:49:36+5:30

Indian Railway: रेल्वे प्रवास हा भारतातील सर्वात लोकप्रिय प्रवास आहे. अनेकजण शहरांमधून गावात जाताना सोबत भरपूर सामानही घेऊन जातात. मात्र रेल्वे प्रवासामध्ये आपण दारूच्या किती बाटल्या सोबत ठेवू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडतो.

Indian Railway: How much alcohol can be carried on train journey? What is Railway Rule, Know | Indian Railway: रेल्वे प्रवासामध्ये किती दारू सोबत ठेवू शकतो? काय आहे रेल्वेचा नियम, जाणून घ्या

Indian Railway: रेल्वे प्रवासामध्ये किती दारू सोबत ठेवू शकतो? काय आहे रेल्वेचा नियम, जाणून घ्या

googlenewsNext

रेल्वे प्रवास हा भारतातील सर्वात लोकप्रिय प्रवास आहे. अनेकजण शहरांमधून गावात जाताना सोबत भरपूर सामानही घेऊन जातात. मात्र रेल्वे प्रवासामध्ये आपण दारूच्या किती बाटल्या सोबत ठेवू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. समोर येत असलेल्या माहितीनुसार रेल्वे मधून मद्य घेऊन जाण्यावर कुठलेही निर्बंध नाही आहेत. काही वर्षांपूर्वी दाखल आरटीआयच्या उत्तरामध्ये ट्रेनमधून दारू नेण्याबाबत काही नियम आहे की नाही याबाबत काही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

याबाबत रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, रेल्वेमधून दारू नेण्यास मनाई आहे. म्हणजेच तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना दारू सोबत बाळगू शकत नाही. ट्रेनमधून दारू घेऊन जात असल्यास किती शिक्षेची तरतूद आहेस याबाबत रेल्वेकडून काहीही उत्तर आलेलं नाही.

जर तुम्ही ट्रेनमधून दारू नेताना तपासणीमधून वाचलात तरी दारूबंदी असलेल्या काही राज्यात तुमच्याकडे दारू सापडल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. ट्रेनमधून दारू नेण्यावर बंदी आहे. काही काळापूर्वीपर्यंत दारूची बाटली बॅगमधून नेता येऊ शकते, असं समजलं जाई. मात्र आता दारूची बाटली उघडी मिळाल्यास आरपीएफ संबंधित व्यक्तीवर शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली दंडात्मक कारवाई करू शकते. तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रेन जात असल्यास दारूबाबतच्या करचोरीचा विषयही समोर येऊ शकतो. अशा परिस्थितीत दोषी व्यक्तीला जीआरपीकडे सोपवले जाऊ शकते. त्यानंतर अबकारी विभागाकडून त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ, शकते. हा दंड किती असेल, याबाबत काही स्पष्ट आदेश दिले गेलेले नाहीत.  

Web Title: Indian Railway: How much alcohol can be carried on train journey? What is Railway Rule, Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.