Indian Railway: IRCTCचं जबदरस्त फिचर, क्षणार्धात बुक होईल तिकीट, असा करता येईल वापर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 09:25 PM2022-06-07T21:25:36+5:302022-06-07T21:26:15+5:30

Indian Railway: जर तुम्ही रेल्वेने प्रवास करायला जात असाल तर बिझी रूटवर सर्वाधिक अडचण ही कन्फर्म तिकीटबाबत येते. मात्र आयआरसीटीसीच्या एका सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही सहजपणे तुमच्यासाठी ट्रेन तिकीट बुक करू शकतील. त्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसी ई व्हॉलेट फिचर वापरावं लागेल.

Indian Railway: IRCTC's great feature is that tickets can be booked instantly | Indian Railway: IRCTCचं जबदरस्त फिचर, क्षणार्धात बुक होईल तिकीट, असा करता येईल वापर 

Indian Railway: IRCTCचं जबदरस्त फिचर, क्षणार्धात बुक होईल तिकीट, असा करता येईल वापर 

Next

मुंबई -  जर तुम्ही रेल्वेने प्रवास करायला जात असाल तर बिझी रूटवर सर्वाधिक अडचण ही कन्फर्म तिकीटबाबत येते. मात्र आयआरसीटीसीच्या एका सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही सहजपणे तुमच्यासाठी ट्रेन तिकीट बुक करू शकतील. त्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसी ई व्हॉलेट फिचर वापरावं लागेल.

त्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुक करताना सहजपणे आणि लवकर पेमेंट करता येईल. तसेच तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यताही वाढेल. हे ई वॉलेट हे दुसऱ्या ई-वॉलेटप्रमाणेच आहे. येथे आम्ही तुम्हाला IRCTC eWallet वापरण्याची पूर्ण पद्धत सांगणार आहोत. 

यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या आयआरसीटीसीच्या अकाऊंटमध्ये लॉगइन करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला आयआरसीटीसी ई वॉलेट सेक्शनमध्ये जावं लागेल. येथे तुम्हाली पॅन आणि आधार व्हेरिफाय करून रजिस्ट्रेशन करावं लागेल.

व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला ई वॉलेट रजिस्ट्रेशन फी म्हणून ५० रुपये द्यावे लागतील. पेमेंट झाल्यानंतर युझरचं अकाउंट लॉगआऊट होईल. तुम्हाला पुन्हा यामध्ये लॉग इन करून आयआरसीटीसी ई वॉलेट रिचार्ज करावं लागेल.

आयआरसीटीसीमध्ये लॉगइन केल्यानंतर तुम्हाला आयआरसीटीसी ई वॉलेट सेक्शनमध्ये जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला आयआरसीटीसी ई वॉलेट डिपॉझिट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर जेवढी रक्कम तुम्ही ट्रान्सफर करू इच्छिता तेवढी रक्कम सिलेक्ट करा.

त्यानंतर ड्रॉपडाऊन मेनूमधून पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून सबमिट बटणावर क्लिक करा. पेमेंट झाल्यानंतर त्याचा मेसेज युझरच्या स्क्रीनवर दिसेल. यामध्ये किमान १०० आणि कमाल १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम अॅड करता येते.

यावरून तिकीट बुक करण्यासाठी सर्वप्रथम आयआरसीटीसी अकाउंटमध्ये लॉगइन करा. त्यानंतर प्रवासाची डिटेल्स भरा. सर्व डिटेल्स रिव्ह्यू केल्यानंतर तिकीट बूक करण्याच्या प्रोसेससाठी पुढे जा. त्यानंतर कॅप्चा कोड एंटर करा. त्यानंतर पेमेंट ऑप्शन दिसेल. मग पेमेंट सिलेक्ट केल्यावर आयआरसीटीची ई वॉलेट हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून पासवर्ड देऊन तुम्ही पेमेंट पूर्ण करू शकता.  

Web Title: Indian Railway: IRCTC's great feature is that tickets can be booked instantly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.