भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; जम्मू-श्रीनगर ३.५ तासांत शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 10:19 PM2023-12-13T22:19:58+5:302023-12-13T22:23:24+5:30

Vande Bharat Express Train In Jammu And Kashmir: काश्मीरमध्ये वंदे भारत सुरू करण्याची योजना असून, भारतीय रेल्वेने विविध चाचण्या सुरू केल्या आहेत.

indian railway likely to run vande bharat express train on udhampur srinagar baramulla route | भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; जम्मू-श्रीनगर ३.५ तासांत शक्य

भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; जम्मू-श्रीनगर ३.५ तासांत शक्य

Vande Bharat Express Train In Jammu And Kashmir: वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करण्याची इच्छा अनेकांची असते. देशात आता ३४ मार्गांवर वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू आहे. तर अनेक मार्गांवर वंदे भारत ट्रेनची सेवा प्रस्तावित आहे. असे असले तरी आमच्या भागातून वंदे भारत सुरू करा, अशी मागणी देशातील अनेक ठिकाणांहून केली जात आहे. यातच आता काश्मीरमध्ये वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याची तयारी भारतीय रेल्वेकडून केली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आताच्या घडीला नवी दिल्ली ते श्री माता वैष्णो देवी कटरा या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहे. तर आता उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला या मार्गावर वंदे भारत सुरू केली जाणार आहे. ही देशातील ४९ वी वंदे भारत ट्रेन ठरू शकते, असे सांगितले जात आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला या मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वे अधिकारी विविध चाचण्या घेत आहेत. यातील काही चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. 

काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत

धमपूर-श्रीनगर-बारामुल्ला या मार्गावरील रेल्वेच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. ICFला या मार्गासाठी विशेष संरचना असलेली ट्रेन बांधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काश्मीरमधील वातावरण, तेथील हवामान आणि एकूणच सर्व परिस्थितीचा विचार करून ही नवी वंदे भारत ट्रेन तयार केली जाणार आहे. वंदे भारत ट्रेनमुळे जम्मू ते श्रीनगर हे अंतर साडेतीन तासांत कापणे शक्य होणार आहे. ही वंदे भारत ट्रेन आठ डब्यांची असणार आहे. 

दरम्यान,  हा मार्ग सुरू झाला की, प्रवाशांना काश्मीरमधील प्रत्येक हंगामात सुरक्षित, निसर्गरम्य आणि आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येईल. काश्मीरमधील शेतकरी सफरचंदांसह इतर अनेक पिकांची देशाच्या इतर भागात सहज वाहतूक करू शकतील. यासह देशातील सर्वांत उंच पूल असलेल्या चिनाब पुलासह इतरही अनेक ठिकाणी पर्यटनाच्या शक्यता तपासल्या जात आहेत. या मार्गातील १११ किमी पैकी सुमारे ९८ किमी मार्गांवर बोगदे आहेत, मोठे पूल आहे, वळणदार मार्ग आहे, याचा आनंदही प्रवासी घेऊ शकतील, असे सांगितले जात आहे. 


 

Web Title: indian railway likely to run vande bharat express train on udhampur srinagar baramulla route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.