रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा नियम लागू; जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 07:58 AM2022-02-18T07:58:58+5:302022-02-18T07:59:16+5:30

रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी नवा नियम लागू; तत्काळ अंमलबजावणी सुरू

indian railway new update for night journey | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा नियम लागू; जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा नियम लागू; जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान

googlenewsNext

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठीचे नियम बदलत असतात. तुम्ही रेल्वे प्रवास करत असाल तर तुम्हाला या नियमांची माहिती असणं गरजेचं असतं. रेल्वेकडून तयार करण्यात आलेलं नियम रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी लागू होतील. रात्रीचा प्रवास करणाऱ्या अनेकांना त्यांच्या सहप्रवाशांमुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी रेल्वेला मिळतात. त्यामुळे रेल्वेनं नियमांमध्ये बदल केले आहेत. प्रवाशांना रात्री कोणतीही अडचण येऊ नये, त्यांची झोपमोड होऊ नये या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या नियमांची तत्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार प्रवासी रात्री मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकत नाही आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकत नाही. प्रवाशांनी तक्रार केल्यास रेल्वे अशा व्यक्तींविरोधात कारवाई करेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

या नियमाच्या अंतर्गत प्रवाशांकडून तक्रार प्राप्त झाल्यास रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना तिथे जाऊन समस्या सोडवावी लागेल. तक्रारीचं निराकरण न झाल्यास त्यासाठी कर्मचारी उत्तरदायी असेल. रेल्वे मंत्रालयानं सगळ्यांना विभागांना याबद्दलचे आदेश दिले असून तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचनादेखील दिल्या गेल्या आहेत. 

शेजारच्या आसनांवरील प्रवासी मोठ्या आवाजात फोनवर बोलत असल्याच्या, गाणी ऐकत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून रेल्वेला मिळतात. काही एकत्र प्रवास करणारे प्रवासी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत असतात. रात्री लाईट सुरू ठेवण्यावरूनही रेल्वे प्रवाशांमध्ये वाद झाले आहेत. 

रात्री १० नंतर खालील नियम लागू
- कोणताही प्रवास मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकत नाही, गाणी ऐकू शकणार नाही.
- रात्री नाईट लाईट सोडून सगळे दिवे बंद करावे लागणार.
- ग्रुपमध्ये प्रवास करणारे प्रवासी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारू शकणार नाहीत. सहप्रवाशांनी तक्रार केल्यास कारवाई होणार.
- चेकिंग स्टाफ, आरपीएफ, इलेक्ट्रिशियन, केटरिंग स्टाफसोबत शांतपणे बोला.

Web Title: indian railway new update for night journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.