पाण्याच्या बाटलीवर ५ रु ज्यादा घेतले, रेल्वेनं ठेकेदाराला ठोठावला १ लाखांचा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 06:01 PM2022-12-18T18:01:47+5:302022-12-18T18:08:54+5:30
भारतीय रेल्वेच्या अंबाला डीविजननं एका केटरिंग ठेकेदाराला पाण्याच्या बाटलीवर निर्धारित किमतीपेक्षा अधिकचे पैसे वसूल केल्यानं दंड ठोठावण्यात आला आहे.
नवी दिल्ली-
भारतीय रेल्वेच्या अंबाला डीविजननं एका केटरिंग ठेकेदाराला पाण्याच्या बाटलीवर निर्धारित किमतीपेक्षा अधिकचे पैसे वसूल केल्यानं दंड ठोठावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे ठेकेदारानं १ लाख रुपयांचा दंड संबंधित ठेकेदाराला ठोठावला आहे. ठेकेदारानं पिण्याच्या पाण्याच्या बाटलीवर ५ रुपये अधिकचे वसूल केले होते.
रेल्वेनं गेल्या काही काळापासून सातत्यानं प्रयत्न करत आहे की स्टेशनवर आवश्यक वस्तूंसाठी ग्राहकांना अधिकचे पैसे द्यावे लागू नयेत. यासाठी रेल्वेनं सहायक उपक्रमाअंतर्गत IRCTC नं आपल्या सर्व वेंडर्स आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी एक प्राइज लिस्ट निश्चित करुन दिली आहे. यात कोणताही वेंडर किंवा कॉन्ट्रॅक्टर निर्धारिक मूल्यापेक्षा अधिक किमतीनं वस्तू विकू शकत नाही. जर असं केलं गेलं आणि त्याची तक्रार रेल्वेला मिळताच संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. तसंच आर्थिक दंड देखील ठोठावण्यात येईल.
नुकतंच एका प्रवाशानं ट्विटरवर पाण्याच्या बाटलीसाठी पाच रुपये जास्तीचे घेतल्याचा व्हिडिओ ट्विट केला होता. यावर IRCTC नं तातडीनं कारवाई करत ठेकेदारावर १ लाखांचा दंड ठोठावला आहे. एक प्रवासी चंदीगढहून शाहजहाँपूर येथे रेल्वेनं प्रवास करत होता. एका वेंडरकडून त्यानं पाण्याची बाटली खरेदी केली. ज्यासाठी वेंडरनं ग्राहकाकडून २० रुपये मागितली. प्रत्यक्षात पाण्याच्या बाटलीची किंमत १५ रुपये इतकी होती. यानंतर प्रवाशानं याची तक्रार रेल्वेकडे केली. आता IRCTC नं कॉन्ट्रॅक्टर आणि वेंडर अशा दोघांवरही कारवाई केली आहे.
IRCTC कडून केली जातेय चौकशी
IRCTC नं याप्रकरणात गांभीर्यानं लक्ष देऊन लायसन्सधारी मेसर्स चंद्रमौली मिश्रा यांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. तर डीआरएम अंबाला मनदीप सिंह भाटिया यांनी सांगितलं की कॉन्ट्रॅक्टरवर १ लाख रुपयांचा दंड ठोठावाण्यात आला आहे. तसंच त्यालाही कारणेदाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. IRCTC आता या संपूर्ण प्रकराची चौकशी करत आहे.