Indian Railway: गोरखपूर नाही या शहरामध्ये आहे देशातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म, चालता चालता थकतील पाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 11:24 AM2023-02-23T11:24:30+5:302023-02-23T11:25:08+5:30

Indian Railway: भारतीय रेल्वेबाबत तुम्ही खूप काही ऐकलं असेल. मात्र जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मपैकी तीन रेल्वे प्लॅटफॉर्म भारतात आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का?

Indian Railway: Not Gorakhpur, this city has the longest platform in the country, legs will get tired while walking... | Indian Railway: गोरखपूर नाही या शहरामध्ये आहे देशातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म, चालता चालता थकतील पाय...

Indian Railway: गोरखपूर नाही या शहरामध्ये आहे देशातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म, चालता चालता थकतील पाय...

googlenewsNext

भारतीय रेल्वे हे जगातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. या रेल्वेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तसेच ऐतिहासिक ठेवा भारतीय रेल्वेने जपला आहे. तसेच भारतीय रेल्वेबाबत तुम्ही खूप काही ऐकलं असेल. मात्र जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मपैकी तीन रेल्वे प्लॅटफॉर्म भारतात आहेत. आता भारतात आणखी एक रेल्वे प्लॅटफॉर्म बांधला गेला आहे. हा प्लॅटफॉर्म कर्नाटकमधील हुबळी रेल्वे स्टेशनवर बांधण्यात आला आहे. त्याचा बोर्डसुद्धा हुबळी रेल्वे स्टेशनच्या बाहेर लावण्यात आला आहे.

हुबळी स्टेशन, दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) झोनचं मुख्यालय आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे बांधला गेलेला प्लॅटफॉर्म भारतातील आणि जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म असलेल्या गोरखपूर येथील स्टेशनच्या प्लॅटफॉर्मपेक्षा मोठा आहे. SWR कडून हुबलीच्या प्लॅटफॉर्म नंबर-१ च्या विस्ताराचं काम सुरू करण्यात आलं होतं. तेव्हाच हा जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म असेल हे निश्चित झाले होते. 

उल्लेखनीय बाब म्हणजे गोरखपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या नावावर आधीपासून World Longest Railway Platform चा विक्रमही नावावर होता. सर्वप्रथम हा मान पश्चिम बंगालमधील खडकपूर स्टेशनला मिळालेला होता. त्याची लांबी १०७२.५ मीटर होती. मात्र री मॉडेलिंगनंतर गोरखपूरच्या प्लॅटफॉर्म नंबर-१ आणि २ची संयुक्त लांबी यापेक्षा अधिक झाली. आता हुबळी रेल्वे स्टेशन चर्चेत आले आहे. 

जगभरातील ६ सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म
१- हुबळी, कर्नाटक, १५०५ मीटर
२- गोरखपूर, उत्तर प्रदेश, १३६६.४ मीटर
३- खडकपूर, पश्चिम बंगाल, १०७२.५ मीटर 
४- स्टेट स्ट्रीट सेंटर सबवे स्टेशन, शिकागो, यूएसए, १०६७ मीटर
५ - ड्युनेडिन रेल्वे स्टेशन, ड्युनेडिन, न्यूझीलंड १००० मीटर
६ - शेरिटन शटल टर्मिनल, फोकेस्टन, युनायटेड किंग्डम, ७९१ मीटर  

Web Title: Indian Railway: Not Gorakhpur, this city has the longest platform in the country, legs will get tired while walking...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.