Indian Railway: व्हॉट्सॲपवरून आता मागवा रेल्वेमध्ये जेवण, १००पेक्षा अधिक रेल्वेस्थानकांवर सेवा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 01:08 PM2022-09-01T13:08:03+5:302022-09-01T13:21:02+5:30

Indian Railway: आता रेल्वेमध्ये व्हॉट्सॲपवरून जेवण मागविण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन’ची (आयआरसीटीसी) अन्न वितरण सेवा ‘जूप’ने ‘जिओ हॅप्टिक’सोबत भागिदारी करून ही सेवा सुरू केली आहे

Indian Railway: Order Meals in Railways now via WhatsApp, service starts at more than 100 railway stations | Indian Railway: व्हॉट्सॲपवरून आता मागवा रेल्वेमध्ये जेवण, १००पेक्षा अधिक रेल्वेस्थानकांवर सेवा सुरू

Indian Railway: व्हॉट्सॲपवरून आता मागवा रेल्वेमध्ये जेवण, १००पेक्षा अधिक रेल्वेस्थानकांवर सेवा सुरू

googlenewsNext

नवी दिल्ली : आता रेल्वेमध्ये व्हॉट्सॲपवरून जेवण मागविण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन’ची (आयआरसीटीसी) अन्न वितरण सेवा ‘जूप’ने ‘जिओ हॅप्टिक’सोबत भागिदारी करून ही सेवा सुरू केली आहे. सध्या १००पेक्षा अधिक रेल्वेस्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
जेवण मागवताना प्रवाशांना आपल्या पीएनआरचा वापर करावा लागेल. प्रवाशांस थेट त्यांच्या आसनावर जेवण मिळेल.

असे मागवा जेवण
- सर्वात अगोदर प्रवाशांनी जूप व्हॉट्सॲप चॅटबोट नंबर ९१ ७०४२०६२०७० सेव्ह करावा.
- जूप चॅटबोटवर आपला १० अंकी पीएनआर टाइप करा.
- येणारे स्थानक व रेस्टॉरंटसचा पर्याय निवडा n पेमेंट करा.
- निवडलेले स्टेशन येताच जूप तुमचे जेवण पोहोचवेल.

Web Title: Indian Railway: Order Meals in Railways now via WhatsApp, service starts at more than 100 railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.