Indian Railway: रेल्वेचा प्रताप : ७० वर्षांच्या आजीला दिला अप्पर बर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 06:50 AM2022-08-28T06:50:51+5:302022-08-28T06:51:12+5:30

Indian Railway: एका ट्विटर वापरकर्त्याने त्याच्या वृद्ध आजी आणि आईला ट्रेनमध्ये वरचा बर्थ दिल्यामुळे संतप्त होऊन भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनवर (आयआरसीटीसी) निशाणा साधला.

Indian Railway: Pratap of Railways: 70-year-old grandmother given upper berth | Indian Railway: रेल्वेचा प्रताप : ७० वर्षांच्या आजीला दिला अप्पर बर्थ

Indian Railway: रेल्वेचा प्रताप : ७० वर्षांच्या आजीला दिला अप्पर बर्थ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क/ नवी दिल्ली : एका ट्विटर वापरकर्त्याने त्याच्या वृद्ध आजी आणि आईला ट्रेनमध्ये वरचा बर्थ दिल्यामुळे संतप्त होऊन भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनवर (आयआरसीटीसी) निशाणा साधला. ज्येष्ठ नागरिकांना बर्थ वाटप करण्यासाठी कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरले जाते?, वयाच्या ७०-८० वर्षांत तुम्ही तरी वरच्या बर्थवर चढू शकता का? कृपया मला उत्तर द्या! ही तुमची जनतेची सेवा आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती त्याने केली. त्यावर आयआरसीटीसीच्या वतीने ‘रेल्वे सेवा’च्या ट्विटर खात्याने स्पष्टीकरण दिले. ‘सीटसाठी कोणताही पर्याय निवडला नाही तरीही रेल्वेची संगणकीकृत आरक्षण प्रणाली ज्येष्ठ व ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला प्रवाशांना खालच्या बर्थचे स्वयंचलित वाटप करण्याची तरतूद करते. तथापि, हे बुकिंगवेळी उपलब्ध असलेल्या लोअर बर्थवर अवलंबून असते. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना ट्रेनमध्ये उपलब्धतेच्या आधारावर ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ वाटप करण्याचाही अधिकार आहे’, असे सांगितले. पण, नेटकरी मात्र सॉफ्टवेअर आणि संकेतस्थळ अपडेट करा, स्पष्टीकरण थांबवा, आमच्यासोबत असा प्रकार घडलाय, अशा प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: Indian Railway: Pratap of Railways: 70-year-old grandmother given upper berth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.