Indian Railway Recruitment 2020: परिक्षा नाही! रेल्वेमध्ये बंपर भरती; 10वी, आयटीआय उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 09:47 AM2020-08-18T09:47:58+5:302020-08-18T09:52:47+5:30
Indian Railway Recruitment 2020: या भरतीसाठी रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) द्वारे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यानुसार 16 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Indian Railway Recruitment 2020: कोरोना लॉकडाऊनमध्ये खासगी कंपन्यांची पुरती वाट लागली आहे. यामुळे अनेकांच्या रोजगारावार गदा आली आहे. अशात सरकारी कंपन्या, बँका, रेल्वे खाते बेरोजगारांसाठी वरदान ठरू लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांत लाखावर सरकारी जागा भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आता भारतीय रेल्वेनेही कंबर कसली असून 4499 जागांवर भरतीटी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
एनएफआर (Northeast Frontier Railway) डिव्हिजनमध्ये ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) द्वारे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यानुसार 16 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
योग्य आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. NFR RRC Recruitment 2020 साठी अर्ज करण्याची लिंक बातमीच्या अखेरीस देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड 10 वीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.
महत्वाच्या तारखा....
- ऑनलाइन अर्जाची सुरुवात - 16 ऑगस्त 2020.
- अंतिम तारीख- 15 सप्टेंबर 2020
शिक्षण
या भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची 10 वी परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी. कमीतकमी 50 टक्के गुण असावेत. शिवाय सोबत आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असावा.
वयाची अट
RRC Recruitment 2020 साठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे असावे. आरक्षणासाठी वयामध्ये सूट दिली जाणार आहे. 1 जानेवारी 2020 नुसार वय पाहिले जाणार आहे.
एससी/एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. तर अन्य़ वर्गांसाठी 100 रुपये शुल्क आहे.
- भरतीच्या जाहिरातीसाठी इथे क्लिक करा...
- नोटिफिकेशन...
- अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...
अन्य महत्वाच्या बातम्या...
Micromax आठवतेय का? चिनी कंपन्यांचा बदला घेणार; नवे स्मार्टफोन आणणार
SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर दंड भरा
महत्वाचे! गृहकर्जाच्या EMIवर बँका मोठी सूट देण्याच्या तयारीत; करत आहेत प्लॅनिंग
मुकेश अंबानी चार छोट्या कंपन्या खरेदी करणार; रिलायन्सकडून जोरदार प्रयत्न
Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता
BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग
सावधान! Work From Home चा मोठा फटका बसणार; Income Tax भरताना नाकीनऊ येणार