Indian Railway: राजधानी एक्स्प्रेसमध्ये लाजिरवाणी घटना, महिलेच्या अंगावर पडली टॉयलेटची घाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 07:00 PM2022-04-15T19:00:54+5:302022-04-15T19:02:14+5:30
Indian Railway: प्रवाशांच्या सुविधेबाबत भारतीय रेल्वेकडून सर्व प्रकारचे दावे करण्यात येतातत. पण, राजधानी एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे.
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सुविधेबाबत अनेक प्रकारचे दावे केले जातात. पण, राजधानी एक्सप्रेसमध्ये एक लाजिरवाणी घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी नागपूरहून नवी दिल्लीला येणाऱ्या एका महिलेच्या अंगावर टॉयलेटमधील सर्व घाण पडल्याची घटना समोर आली आहे. महिलेने ट्रेनच्या टॉयलेटमील फ्लशचे बटन दाबताच पाईपमधील सर्व घाण तिच्या अंगावर पडली.
बिलासपूर राजधानीच्या बी-10 कोचमध्ये सकाळी 9च्या सुमारास ही घटना घडली. अमरावती येथी कुटुंब राजधानी एक्सप्रेसने नवी दिल्लीला जा होते. संध्याकाळी त्यांना निजामुद्दीनहून वैष्णोदेवीला जाण्यासाठी दुसरी ट्रेन पकडायची होती. मात्र या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबाला एकप्रकारे धक्काच बसला आहे.
या घटनेनंतर रात्री अकराच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवली. बी-10 कोचच्या बायो टॉयलेटमध्ये ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे बायो टॉयलेट हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येते. स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यासाठी भारतीय रेल्वे आपल्या गाड्यांमध्ये बायो टॉयलेट बसवत आहे. पण जेव्हा अशी घटना घडते तेव्हा लोकांना आश्चर्य वाटणे साहजिकच आहे.