Indian Railway:...म्हणून रेल्वे स्टेशनच्या बोर्डावर लिहिली जाते समुद्र सपाटीपासूनची उंची, हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 12:44 PM2021-08-22T12:44:11+5:302021-08-22T12:48:43+5:30
Indian Railway News:तुम्ही रेल्वे स्टेशनचे नाव लिहिण्यात आलेल्या बोर्डावर खालच्या बाजूला समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिलेली वाचली असेल. HT Above MSL 79.273 M असा उल्लेख तुम्ही स्टेशनचे नाव असलेल्या बोर्डावर पाहिला असेल.
नवी दिल्ली - भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हटले जाते. दररोज या रेल्वेमधून लाखो लोक प्रवास करत असतात. रेल्वेतून प्रवास केला नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. (Indian railway )या रेल्वे प्रवासादरम्यान, तुम्ही रेल्वे स्टेशनचे नाव लिहिण्यात आलेल्या बोर्डावर खालच्या बाजूला समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिलेली वाचली असेल. HT Above MSL 79.273 M असा उल्लेख तुम्ही स्टेशनचे नाव असलेल्या बोर्डावर पाहिला असेल. पण रेल्वेच्या साईन बोर्डावर समुद्र सपाटीपासूनची उंची का नोंद केली जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? जर माहिती नसेल तर याबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. (so the height above sea level is written on the board of the railway station)
देशातील जवळपास सर्वच रेल्वे स्टेशनच्या साईन बोर्डावर समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिलेली असते. तसेच पाहिले तर सर्वसामान्यांच्या दृष्टीने याचा काही खास उपयोग नसतो. मात्र ट्रेनचे लोको पायलट आणि गार्डच्या दृष्टीने याला फार महत्त्व असते. रेल्वे स्टेशनवर समुद्र सपाटीपासून उंचीचा ऊल्लेख हा लोको पायलट आणि गार्डच्या मदतीसाठी केला जातो. त्यामुळे ते ट्रेन किती उंचीच्या दिशेने घेऊन जात आहेत, याचा अंदाज त्यांना मिळतो. त्यामुळे ट्रेनची गती किती ठेवायची, ट्रेनच्या इंजिनाला किती पॉवर द्यायची, याबाबत ट्रेनचालक अचूक माहिती मिळते.
तसेच जर ट्रेन समुद्र सपाटीपासून खालच्या दिशेने जात असेल तर ड्रायव्हरला ट्रेनची गती किती ठेवायची. फ्रिक्शन किती लावावे लागेल, या सर्वांबाबतचा अंदाज घेण्यासाठी समुद्र सपाटीपासून उंची लिहिली जाते.
आपली पृथ्वी गोल आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठराविक अंतराने थोडा कर्व येतो. मात्र जमिनीची उंची मोजण्यासाठी एका अशा पॉईंटची गरज असते. जो समान राहील. समुद्र यासाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे पृथ्वीची उंची मोजण्यासाठी समुद्र सपाटीपासून विचार केला जातो.