Indian Railway: ट्रेन बराच काळ थांबणार असली तरी इंजिन का बंद करत नाहीत, असं आहे खास कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 12:01 PM2023-02-11T12:01:03+5:302023-02-11T12:01:36+5:30
Indian Railway: जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुम्ही पाहिलं असेल की, ट्रेन कुठल्याही स्टेशनवर कितीही वेळ थांबली तरी तिचं इंजिन बंद केलं जात नाही. एवढंच नाही तर ट्रेन कुठल्याही दोन स्टेशनच्यामध्ये थांबली तरी तिचं इंजिन बंद केलं जात नाही.
जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुम्ही पाहिलं असेल की, ट्रेन कुठल्याही स्टेशनवर कितीही वेळ थांबली तरी तिचं इंजिन बंद केलं जात नाही. एवढंच नाही तर ट्रेन कुठल्याही दोन स्टेशनच्यामध्ये थांबली तरी तिचं इंजिन बंद केलं जात नाही. त्यामुळे हे इंजिन बंद न करण्यााबाबत नेमकं कारण काय, याबाबतची उत्सुकता अनेकदा तुमच्याही मनात निर्माण झाली असेल. इंजिन बंद केल्यास डिझेलची बचत होईल, मग रेल्वे असं का करत नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
आज आम्ही यामागचं कारण तुम्हाला सांगणार आहोत. डिझेल इंजिनची बांधणी ही अशा प्रकारे केलेली असते की जर हे इंजिन बंद केले तर लोको पायलट आणि प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत.
त्यामागचं पहिलं कारण म्हणजे डिझेल इंजिनाचं तंत्र हे गुंतागुंतीचं असतं. या गुंतागुंतीमुळे लोको पायलटला स्टेशनवर किंवा इतर कुठेही ट्रेन थांबली तरी ट्रेनचं इंजिन सुरू ठेवावं लागतं. जेव्हा ट्रेन कुठल्याही स्टेशनजवळ थांबते, तेव्हा रेल्वे इंजिन ब्रेक प्रेशर गमावतं. ट्रेन थांबल्यावर जो शिटीचा आवाज येतो तो प्रेशर रिलीज होण्याचा इशारा असतो. त्यानंतर पुन्हा प्रेशर बनल्यानंतर अधिक वेळ लागतो. जेव्हा इंजिन बंद केल्यानंतर हे इंजिन सूरू करण्यासाठीच अधिक वेळ लागेल. त्यामुळे इंजिन बंद केलं जात नाही.
तर दुसरं कारण म्हणजे रेल्वे इंजिन बंद केल्यास लोकोमोटिव्ह इंजिन फेल होण्याची भीती असते. त्यामुळे डिझेल इंजिनामध्ये एक बॅटरी लावलेली असते. जेव्हा इंजिन चालू असतं तेव्हाची ती चार्ज होते. इंजिन बंद केल्यास बॅटरी चार्ज होणं बंद होते. तसेच वारंवार इंजिन चालू बंद केल्याने बॅटरीवर परिणाम होतो. तसेच इंजिन बिघडू शकते. म्हणूनच इंजिन कधीही बंद केलं जात नाही.